भारताचा कर्णधार विराट कोहलीने कालच्या दिवशी म्हणजे ९ जून २०१९ला आपल्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषकात सलग दूसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात कर्णधार विराटने आपल्या ८२ धावांच्या खेळीसह क्रिकेटप्रती आपल्या भावना दाखवत चाहत्यांचे मन जिंकले होते.
झाले असे होते की, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर थर्ड मॅनच्या सीमारेषेजवळ उभा राहून क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी भारतीय चाहते स्मिथविरुद्ध गद्दार-गद्दार अशा शब्दांचा नारा लावत होते. हे निदर्शनास येताच फलंदाजी करणाऱ्या विराटने भारतीय दर्शकांकडे रागाने आपली नजर फिरवली आणि स्मिथसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या.
With India fans giving Steve Smith a tough time fielding in the deep, @imVkohli suggested they applaud the Australian instead.
Absolute class 👏 #SpiritOfCricket #ViratKohli pic.twitter.com/mmkLoedxjr
— ICC (@ICC) June 9, 2019
अर्थात विराटने स्मिथचा बचाव करत भारतीय दर्शकांना अशी नारेबाजी करु नका असे संकेत दिले. विराट दर्शकांना म्हणाला की, “तुम्ही स्मिथचा विरोध करु नका. उलट त्याची प्रशंसा करत त्याच्यासाठी टाळ्या वाजवा.” विराटच्या या वागणुकीमुळे स्मिथ खूप प्रभावित झाला आणि त्याने विराटची पाठ थोपटवली. सामना झाल्यानंतर विराटने प्रेस कॉन्फरन्समध्ये दर्शकांच्या वतीने स्मिथची क्षमा मागितली होती.
विराटच्या या व्यवहारासाठी चाहते सोशल मिडीयावर त्याची खूप प्रशंसा करत होते. एवढेच नव्हे तर, आयसीसीनेही स्वत: विराटचा तो व्हिडिओ ट्वीट करत त्याची प्रशंसा केली होती. तसेच आयसीसीने २०१९ चा सर्वोत्तम खिलाडूवृत्तीचा पुरस्कारही विराटला दिला होता.
मार्च २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार स्मिथवर चेंडू छेडछाड प्रकरणामुळे एक वर्षांची बंदी लावली होती. स्मिथसह ऑस्ट्रेलिया संघातील डेविड वॉर्नर आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांच्यावरतीही बंदी लावली होती. त्यामुळे पुनरागमन केल्यानंतर त्यांना बऱ्याचदा चाहत्यांच्या खराब कमेंट्सचा सामना करावा लागत होता. याच कारणामुळे भारताविरुद्धच्या या सामन्यात भारतीय दर्शक स्मिथबद्दल तसे नारे लावत होते.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३५ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा फडकवली होती विजयी पताका
काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती
मिलर-दुसेन जोडीकडून धावांचा मारा, भारतीय संघापुढे भारतातच रचली सर्वात मोठी भागीदारी