भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या विश्रांतीवर आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यापाठोपाठ विराटने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यातूनही माघार घेतली आहे. शनिवारी (३० जुलै) बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली, पण विराटचे नाव या संघात नसल्यामुळे चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली.
https://twitter.com/Rohirat_Fans/status/1553410589963141121?s=20&t=wPSdfFiTTKzFnyM9z8hICg
अलिकडच्या काही महिन्यांमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याला अनेकदा विश्रांती दिली गेली आहे. विराटने भारताचे आणि त्याची आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याचा जुना फॉर्म पुन्हा पाहायला मिळेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु असे काही होताना दिसले नाही. अशात आता झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून त्याला पुन्हा विश्रांती मिळाल्यामुळे चाहते आणि इतरही नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
https://twitter.com/Aaliya_Zain5/status/1553391430818598913?s=20&t=RKnDxg5YPShhATka5IWsyQ
How much rest does virat needs, m his fan too but it's getting too much, no one has birthright on indian team and tell me one more job in this world where u can get this much paid leave.
Very Dissaopinting— Raazi (@Crick_logist) July 30, 2022
अनेकांच्या मते विराटला बीसीसीआय आणि निवडकर्त्यांकडून दिली जाणारी विश्रांती अनावश्यक आहे. दरम्यान, मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज विराटला विश्रांतीची गरज असल्याचे सांगत आहेत. पण दुसरीकडे आता विराटने विश्रांती घेतल्यानंतर अनेकजण म्हणत आहेत की, त्याला विश्रांतीची गरज नाहीये. इरफान पठाण आणि वेंकटेश प्रसाद अशा दिग्गजांनी म्हटले आहे की, फॉर्ममध्ये परतण्यासाठी विश्रांतीचा कसलाही फायदा होत नसतो.
after seeing the squad for Zimbabwe tour Virat Kohli to BCCI selectors : pic.twitter.com/rXgd9JWKfe
— Anonymous9726 (@Anonymous97261) July 30, 2022
Virat kohli isn't selected on zimbabwe tour pic.twitter.com/54R5vTO6T1
— Abhinash (@Abhi_meme) July 30, 2022
Virat kohli isn't selected on zimbabwe tour pic.twitter.com/54R5vTO6T1
— Abhinash (@Abhi_meme) July 30, 2022
दरम्यान, विराटच्या प्रदर्शनचा विचार केला, तर तो मागच्या अडीच वर्षांपेक्षा मोठ्या काळापासून चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाहीये. यादरम्यानच्या काळात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक केले नाहीये. विराटने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकूण ७० शतके केली असून चाहते त्याच्या ७१ वे शतक पाहण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडीविरुद्ध खेळलेल्या डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक केले होते.
https://twitter.com/WtffSamy/status/1553395778135429120?s=20&t=3XupxFQ4h8xj1T1BVgDkJw
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपर चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानला झटका देण्यासाठी भारताची रणनिती बदलली, हरमनप्रीत उचलणार मोठे पाऊल
‘ये दिल मांगे मोअर!’ भारतीय फलंदाजांनी ठोकल्या १९० धावा तरीही रोहितचे मन भरेना, वाचा काय म्हणाला
‘लवकरच पुनरागमन करणार’, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहिर होताच केएल राहुलने केली भावनिक पोस्ट