भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिका गमावल्यानंतर चहुबाजूंनी टीकेचा सामना केला होता. संघनिवडीसह इतर निर्णयांवरून अनेक माजी दिग्गजांनी कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाला लक्ष्य केले होते. मात्र, त्यांनतर टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयानंतर आता भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय प्राप्त केला. यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट शेअर करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
“मजा आ गया…”
सेहवागने केलेल्या ट्विटमध्ये हार्दिक पंड्याच्या फटकेबाजीचं विशेष कौतुक केले आहे. “हार्दिकची जबरदस्त हिटिंग”, असे म्हणत सेहवागने त्याच्या फटकेबाजीला दाद दिली. सेहवागने केएल राहुल आणि शिखर धवन यांनी उत्तम सुरुवात दिली, असं प्रशस्तीपत्र सुद्धा दिले. तसेच विराट कोहली आणि टी नटराजन यांनीही उपयुक्त योगदान दिल्याची पुस्ती सेहवागने दिली.
Zabardast hitting by @hardikpandya7 .
Wonderful start from @SDhawan25 and @klrahul11 , @imVkohli and a sensational bowling spell from @Natarajan_91 . And India seal the T20 series with a game to go. Maza aa gaya. pic.twitter.com/VDgb6CwT33— Virender Sehwag (@virendersehwag) December 6, 2020
भारताने सांघिक कामगिरीने मिळविला विजय
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सांघिक कामगिरीने विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५ बळी गमावत १९४ धावा केल्या. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना टी नटराजनने ४ षटकांत केवळ २० धावा देत आणि २ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला लगाम घातला. त्याला शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ बळी घेत सुयोग्य साथ दिली.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारताकडून फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवनने ५२ धावांची खेळी करत विजयाची पायाभरणी केली. नंतर कर्णधार विराट कोहली याने ४० धावा, तर हार्दिक पंड्याने नाबाद ४२ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने मालिका २-० अशा फरकाने खिशात टाकली. मालिकेतील तिसरा सामना ८ डिसेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…बेस्ट इन ब्ल्यू’, सामनावीर ठरलेल्या पंड्यासाठी मुंबई इंडियन्सचे खास ट्वीट
‘हिटमॅन’ने केले भारतीय संघाचे अभिनंदन, ट्वीट करत म्हणाला…
याला सातत्य असे नाव! भारतीय संघाची ‘ही’ कामगिरी पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर