वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकाचा पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) खेळला गेला. ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेलेल्या या सामन्यात भारताने ६८ धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने दिलेले योगदान महत्वपूर्ण ठरले. सामना संपल्यानंतर अश्विनसोबत बोलताना कार्तिकने आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची प्रतिक्रिया दिली.
कार्तिकच्या मते मध्यक्रमात खेळणारा परिस्थिती आणि चेंडूचा अंदाज घेण्यासाठी, फलंदाज चपळ असला पाहिजे. रविचंद्रन अश्विस (Ravichandran Ashwin) सोबत बोलताना दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) स्वतःच्या प्रदर्शाविषयी देखील चर्चा केली. कार्तिक म्हणाला की, जसे की तुम्ही पाहिले, जेव्हा तू (अश्विन) फलंदाजीला आला आणि जडेजा बाद झाला. तो खेळातील खूपच महत्वाचा टप्पा होता, जो १६५ आणि १९० धावांमधील अंतर ठरला असता. आम्ही एक खूपच चतुर भागीदारी केली. आम्ही मध्ये-मध्ये संघर्ष केला आणि शेवटी मात्र विस्फोटक खेळी केली. आम्ही ते लक्ष्य प्राप्त करण्याचे ठरवले आणि तसे केले देखील.
कार्तिक म्हणाला की, “फिनिशरची भूमिका पार पाडणे सोपे नसते. यासाठी तुमच्याकडे खूप समतोल साधावा लागतो. यासाठी खूप काही करावे लागते.” कार्तिकने पुढे असेही सांगितले की, सामन्यात एक वेळ अशीही आली होती, जेव्हा भारतीय संघ दबावात होता. त्याच्या मते भारताने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले. आगामी टी-२० विश्वचषकाविषयी अश्विनसोबत बोलताना कार्तिक म्हणाला की, “जर आम्हा दोघांची यामध्ये (विश्वचषक) काही भूमिका असेल, तर त्याचा आनंद असेल. निश्चितच शेवटचा टी-२० विश्वचषक जिंकायचा आहे आणि मला विश्वास आहे की, आम्हा दोघांना यावेळी देखील भूमिका पार पाडावी लागेल.”
दरम्यान, वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यानंतर भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारता सध्या ०-१ अशा आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात मालिकेतील दुसरा सामना १ ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘पाकिस्तानच्या चुकांची पुनरावृत्ती सध्या टीम इंडिया करत आहे’, माजी दिग्गजाचा दावा
झिम्बाब्वे दौऱ्यातून विराटची माघार; नेटकरी म्हणाले, ‘अजून किती वेळ…?’
मुलाच्या जन्मानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केले लग्न, लव्हस्टोरी आहे खूपच जबरदस्त