क्रिकेटमध्ये आपण बरेचदा एका खेळाडूला दुसऱ्या खेळाडूची मुलाखत घेताना पाहिलं आहे. याबाबतीत भारताचा फिरकीपटू यूझवेंद्र याबाबतीत नेहमीच चर्चेत असतो. मात्र, नुकताच राजस्थान रॉयल्सचे दोन स्टार खेळाडू जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स या दोघांनीही एकमेकांबरोबर प्रश्नोत्तराचा खेळ खेळला. त्यात बेन स्टोक्सने विचारलेल्या प्रश्नांची आर्चरने उत्तरे दिली.
अर्चरचा आवडता हिंदी शब्द कोणता?
नुकतेच हे दोन स्टार गोलंदाज रॅपिड फायर राऊंड खेळताना दिसलें. तिथे त्यांनी आयपीएल ते त्यांच्या वैयक्तिक जीवनापर्यंतच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. स्टोक्सने आर्चरला त्याच्या आवडत्या हिंदी शब्दाबद्दलही विचारले. तथापि, बेन स्टोक्स म्हणाला की “तू हिंदी शब्द बोलू शकशिल का, हे मला माहित नाही.”
यावर बोलताना आर्चर म्हणाला की, “हो मी हिंदी नाही बोलू शकत, मुळीच नाही.”
तथापि, त्यानंतर आर्चर म्हणाला की, “जल्दी, हा माझा आवडता हिंदी शब्द आहे, असं म्हणू शकतो.”
मराठी भाषेत जल्दी या शब्दाचा अर्थ ‘पटकन’ असा होतो.
https://twitter.com/pant_fc/status/1322447158709137413?s=20
बेन स्टोक्स हा देखील आवडता हिंदी शब्द
बेन स्टोक्स हा देखील त्याचा आवडता हिंदी शब्द आहे, असे सांगत त्याने एक विनोद केला. आर्चर एका मजेच्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते. यातच त्याने स्टोक्सचे नाव सोयीस्करपणे हिंदी शब्दात रूपांतरित केले.
आर्चर बेन स्टोक्सला म्हणाला की, “आवडता हिंदी शब्द म्हणून बेन स्टोक्ससुद्धा म्हणू शकता”
यावर स्टोक्सने उत्तर दिले, “माझे नाव हिंदी शब्दात बदलले गेले आहे”
राजस्थानव्यतिरिक्त 3 संघ प्ले ऑफच्या शर्यतीत
सन 2008 चा आयपीएल चॅम्पियन राजस्थान रॉयल्स सध्या आयपीएल 2020 मध्ये 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. राजस्थानव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हा तूझा शेवटचा सामना आहे का? प्रश्नावर धोनीने दिले ‘हे’ उत्तर
क्रिकेटपटूंचे विक्रम अनेक पाहिले, आता ‘या’ अंपायरनेचे केलाय मोठा कारनामा
जोडी नंबर वन! तब्बल ९४ वर्षांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या जोडीने मोडला ‘हा’ मोठा विक्रम
ट्रेंडिंग लेख –
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण