आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा जोरात सुरू आहे. सर्व संघाने आपले महत्त्वपूर्ण क्रिकेटपटू कायम राखल्यानंतर सर्वजण लिलावाची वाट पाहत आहेत. १८ तारखेला हा लिलाव पार पडेल. तत्पूर्वी, तब्बल १,०९७ भारतीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी ह्या लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी प्रकाशित केले. विशेष म्हणजे या सर्व क्रिकेटपटू मध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे नाव नाही.
चेन्नई येथे होणार लिलाव
जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी सर्वजण उत्साहित आहेत. त्या अनुषंगाने या हंगामासाठीचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडेल. दुपारी तीन वाजता या लिलावाला सुरुवात होईल. दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू या लिलावासाठी नावनोंदणी करत असतात. या वर्षी देखील तशाच प्रकारे खेळाडू नाव नोंदणी करतील अशी सर्वांना अपेक्षा होती.
१,०९७ क्रिकेटपटूंनी केली नावनोंदणी
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार आयपीएलच्या आगामी हंगामासाठी तब्बल १,०९७ खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये ८१४ भारतीय व २८३ विदेशी खेळाडूंची नावे आहेत. या यादीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले २१ क्रिकेटपटू आहेत. तसेच १८६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली विदेशी क्रिकेटपटू आहेत. आयसीसीचे सहयोगी देश असलेल्या देशांच्या २७ क्रिकेटपटूने देखील यात सहभाग नोंदविला आहे. उर्वरित क्रिकेटपटू हे कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाहीत.
इतक्या क्रिकेटपटूंचा होणार लिलाव
आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक फ्रेंचायजींना २५ क्रिकेटपटू संघात ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे या लिलावामध्ये जास्तीत जास्त ६१ क्रिकेटपटू विकले जाऊ शकतात. त्यापैकी २२ क्रिकेटपटू हे विदेशी असतील.
क्रिकेटपटूंची देशनिहाय यादी
भारत- ८१४
अफगानिस्तान- ३०
ऑस्ट्रेलिया- ४२
बांगलादेश- ५
इंग्लंड- २१
आयर्लंड- २
नेपाळ- ८
नेदरलँड- १
न्यूझीलंड- २९
स्कॉटलंड- ७
दक्षिण आफ्रिका- ३८
श्रीलंका- ३१
यूएई- ९
अमेरिका- २
वेस्ट इंडीज- ५६
झिम्बाब्वे- २
महत्वाच्या बातम्या:
सध्या चर्चेत असलेल्या रिहानाचे ख्रिस गेलशी आहे खास नाते, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल
कुलदीप यादवला संघात स्थान न दिल्याने गंभीरची संघ व्यवस्थापनावर टीका; म्हणाला