मुंबई । हार्दिक पंड्याकडून गुरुवारी क्रिकेट चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली. त्याची पार्टनर नताशा स्टॅनकोविचने एका मुलाला जन्म दिला. त्याचवेळी, पंड्याने आपल्या लहान मुलाचे फोटोही चाहत्यांसह शेअर केले. पंड्या आणि नताशाने जानेवारीच्या सुरुवातीला साखरपुडा केला होता. पण त्या दोघांचे लग्न झाले की नाही याबाबत कोणालाही स्पष्ट कल्पना नाही. या दोघांचाही हवनजवळ बसलेला फोटो समोर आले असले तरी या जोडप्याने लग्नाला दुजोरा दिला नाही.
अशा परिस्थितीत पंड्या हा पहिला क्रिकेटपटू नाही ज्याने लग्नाबद्दल काही न सांगता वडील होण्याची आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या आधीही असे अनेक क्रिकेटपटू होते जे लग्न न करताच वडील झाले होते. त्यातील ४ क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा.
४. ख्रिस गेल
विंडीज संघाचा फलंदाज ख्रिस गेल स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. तो क्रिकेटसोबत ऐशो आरामात जीवन जगणेही पसंत करतो. गेलची पत्नीने लग्न होण्यापूर्वी एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव बलश रक्खा असे ठेवले होते.
३. जो रुट
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज आणि कसोटी कर्णधार जो रूट हा अलीकडेच दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याचे लग्न झाले नव्हते. त्याने त्याच्या मुलाच्या जन्मानंतर २०१८मध्ये लग्न केले. यानंतर काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी केरी कॉटरलने त्यांच्या मुलीला जन्म दिला आहे.
२. विनोद कांबळी
सचिन तेंडुलकरचा खास मित्र विनोद कांबळी लग्नाआधीच वडील बनला होता. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नोएला लाविस असे होते, त्याने तिला घटस्फोट दिला आहे. त्यानंतर त्याचे फॅशन मॉडेल एंड्रिया हेविटसोबत अफेयर सुरु झाले. दरम्यान, आंद्रियाने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर लवकरच कांबळीनेही आंद्रेयाशी लग्न केले. त्याच्या मुलाचे नाव जीजस ख्रिस्तियानो आहे.
१. डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने त्याची गर्लफ्रेंड कँडिस वॉर्नरशी एप्रिल 2015 मध्ये लग्न केले होते. पण लग्नाआधीच तो एका मुलीचा बाप झाला होता. कँडिसने सप्टेंबर 2014 मध्ये एका मुलाला जन्म दिला होता.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम
कर्टिस कॅम्फर – आयर्लंड क्रिकेटचा भविष्यातील सितारा
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान
विमानतळावर लाऊंजच्या एका कोपऱ्यात बसून राहिला ‘हा’ खेळाडू, जाणून घ्या कारण..