साऊथँम्पटन। इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्सचा असा विश्वास आहे, की इंग्लंडचा वनडे संघ अधिक मजबूत आहे. परंतु भारतात होणाऱ्या २ विश्वचषकांमध्ये खेळण्यासाठी आयपीएलमधील अनुभवाचा त्याला बराच फायदा होईल.
२०२३ मध्ये वनडे विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. त्याआधी भारतात टी२० विश्वचषक होईल. बिलिंग्सचा असा विश्वास आहे की, त्याच्याकडे फिरकी चेंडू खेळण्याची चांगली क्षमता असल्यामुळे तो भारतात चांगला खेळू शकतो.
फ्रंचायझीच्या अनुभवाचा मिळाला फायदा
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलेल्या बिलिंग्सने स्कायस्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, “मला वाटते की निश्चितच ही अशी गोष्ट आहे, जिथे मी इतर खेळाडूंपेक्षा थोडे चांगली कामगिरी करू शकतो. विशेषत: आयपीएलमध्ये फिरकीविरूद्ध खेळताना मला विविध फ्रंचायझींच्या अनुभवांचा फायदा झाला.”
फिरकी खेळपट्ट्यांवर मिळाले यश
तो पुढे म्हणाला, “चेन्नई आणि दिल्ली येथे फिरकी खेळपट्ट्यांवर यश आले. मला त्यावर काम करत रहावे लागेल. वनडे क्रिकेट प्रकारात किंवा कसोटी सामन्यात मला वाटते की मी चांगली कामगिरी करू शकेल. जर मला संधी मिळाली तर मी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू इच्छितो.”
२९ वर्षीय बिलिंग्सने (Sam Billings) १६ वनडे आणि २६ टी२० सामने खेळले आहेत. परंतु २०१५ मध्ये पदार्पण केल्यापासून तो इंग्लंडच्या संघात नियमित झाला नाही. परंतु जेव्हा आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला, तेव्हा त्याने त्याचा पुरेपूर फायदा उचलला.
जो डेन्लीला झालेल्या (Joe Denly) पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी संघात सामील करण्यात आलेल्या बिलिंग्सने गुरुवारी (३० जुलै) पहिल्या वनडे सामन्यात आयर्लंडविरुद्ध नाबाद ६७ धावांची खेळी करत इंग्लंडला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. त्याचबरोबर शनिवारी (१ ऑगस्ट) दुसऱ्या वनडे सामन्यात बिलिंग्सने नाबाद ४६ धावांची खेळी केली. आणि इंग्लंडने ४ विकेट्सने विजय मिळविला.
महत्त्वाच्या बातम्या –
-वेस्ट इंडीज संकटात; या देशाने दौरा केला रद्द
-२०११च्या विश्वचषकादरम्यान आशिष नेहराला शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरने केली होती ‘ही’ मदत
-‘भारताला विश्वचषक जिंकून देऊनच निवृत्त होणार’, पहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख –
-वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज
-या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल
-आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम