क्रिकेट जगतातील कित्येक क्रिकेटपटूंनी दमदार खेळी करत अनेक अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मग एखादा खेळाडू नवा विक्रम करत पहिल्यांदा त्या विक्रमाची नोंद करणारा पहिलाच खेळाडू ठरतो. तर काही खेळाडू जुने विक्रम मोडत ते आपल्या नावावर करुन घेत असतात.
विक्रम कसाही असो, पण एकदा त्याची नोंद झाली की त्याला पुसणे अशक्य काम असते. जरी तो विक्रम मोडत कुणी आपल्या नावावर केला तरी त्याला प्रथम करणाऱ्या क्रिकेटपटूची आठवण काढली जाते. परंतु, एखाद्या क्रिकेटपटूच्या एका चुकिच्या पावलामुळे त्याच्यावर बसलेल्या कलंकाचा ठप्पा मात्र कधीही पुसता येत नाही.
या लेखात आपण अशाच ६ क्रिकेटपटूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना अटक करण्यात आले होते. 6 Cricketers Who Get Arrested In Their Career
१. मखाया एंटिनी
ही घटना १९९८मध्ये घडली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज मखाया एंटिनीवर पूर्व लंडनमध्ये बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. त्यांच्यावरील या आरोपामुळे त्यांना काही वेळासाठी कारागृहात (जेल) ठेवण्यात आले होते. मात्र, मखायाविरुद्ध कसलेही पुरावे न मिळाल्याने त्यांना सोडण्यात आले. ६ वर्षांच्या शिक्षेतून वाचल्यामुळे मखाया यांनी खूप जल्लोष साजरा केला होता. मखायाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १०१ कसोटी सामन्यात ३९० विकेट्स घेतल्या आहेत. तर, १७३ वनडेत २६६ विकेट्स आणि १० टी२०त ६ विकेट्स घेतल्या आहेत.
२. विनोद कांबळी
२०१५मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मित्र विनोद कांबळी आणि कांबळीच्या पत्निला अटक करण्यात आले होते. त्यांच्या घरात काम करणाऱ्या बाईने पगार मागितल्यामुळे तिला मारहाण करण्याच्या आरोपात त्यांना कारागृहात जावे लागले होते. त्यावेळी कांबळीने फक्त त्या कामवालीला मारहाण केली नव्हती. तर, खोलीत बंद करुन तिला परत कामावर येऊ नको अशी धमकी दिली होती. मात्र, कांबळीने आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले होते.
३. वसीम अक्रम
वसीम अक्रम याच्याबरोबर वकार यूनुस, आकिब जावेद आणि मुश्ताक अडमद यांना वेस्ट इंडिजच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रगच्या कारणामुळे अटक करण्यात आले होते. त्यांच्या सामानात ड्रग असल्याच्या आरोपामुळे त्यांना कारागृहात बंद करण्यात आले होते. मात्र, पूर्ण तपासणीनंतर क्रिकेटपटूंकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग असल्याचे न आढळल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते.
४. नवज्योत सिंग सिद्धू
१९९८ मध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे भारतीय संघातील युवा खेळाडू होते. शिवाय तेवढेच ते रागिष्ट स्वभावाचे होते. रस्त्यावर त्यांच्या कारला ५० वर्षीय रुपिंदर सिंग सिद्धूने धडक दिल्यामुळे नवज्योत सिद्धू खूप चिडले होते. त्यांचा राग इतका वाढला होता की त्यांनी रुपिंदरला मारहाण केली होती. त्यांच्या या कृत्यामुळे रुपिंदरला हृदयविकाराचा झटका आला. म्हणून नवज्योत सिद्धूला काही दिवस कारागृहात रहावे लागले होते.
५. शहादत हुसेन
बांग्लादेशचा क्रिकेटपटू शहादत हुसेनला आपल्या ११ वर्षांच्या घरकाम करणाऱ्या मुलीला मारण्याचा आरोपात अटक करण्यात आले होेते. मात्र, हुसेन पळून गेले. शेवटी ३ आठवड्यांनंतर पोलीसांनी त्यांना शोधून अटक करत कोर्टात हजर केले होते.
६. शेन वॉर्न
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न हा नेहमी मुलिंच्या विषयावरुन वादांच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. एकदा एका आफ्रिकन महिलेने त्याच्यावर नकोसे मॅसेज पाठवण्याचा आरोप केला होता. तिने त्याच्यावर केस ठोकल्यामुळे बरेच दिवस प्रकरणाची तपासणी करण्यात आली होती. यामुळे वॉर्नला कारागृहात दाखल करण्यात आले होते. शिवाय, अनेकदा वॉर्नच्या मुलिंसोबत गैरवर्तन करतानाच्या बातम्याही पाहायला मिळतात.
ट्रेंडिंग लेख-
पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स
जगातील सर्वात महागडे अंपायर; पगाराच्या रक्कम ऐकून व्हाल अवाक्
वनडेत वेगवान दीडशतकी खेळी करणारे ५ फलंदाज