क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.5 षटकात 5 विकेट्स राखून भारताचे आव्हान पूर्ण केले आणि सामना जिंकला. पाकिस्तानसाठी हा पराभव अविस्मरणीय असा ठरला. कारण तब्बल 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्यांना भारताला पराभूत करण्यात यश आले आहे.
पाकिस्तानला यापूर्वी 2014 साली भारतावर विजय मिळवता आला होता. 8 वर्षांपूर्वी 2 मार्चला ढाका येथे भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 1 विकेट राखून विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा, अंबाती रायुडू आणि रविंद्र जडेजा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 245 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने मोहम्मद हाफिजच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर 49.4 षटकातच भारताचे आव्हान पूर्ण केले होते आणि सामना खिशात घातला होता.
या सामन्यानंतर उभय संघात आशिया चषकात 5 सामने खेळले गेले. ज्यापैकी सलग 4 सामने भारताने जिंकले आणि अखेर आताचा सामना जिंकत पाकिस्तानने आपली पराभवाची मालिका मोडली आहे.
भारतासाठी कठीण बनली अंतिम सामन्याची समीकरणे?
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. आता भारताला त्यांचे सुपर-4 फेरीतील दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. जर भारताने दोनपैकी एकही सामना गमावला, तर त्यांच्यावर आशिया चषकातून बाहेर होण्याची नामुष्की ओढावू शकते. भारतीय संघाचा पुढील साखळी फेरी सामना श्रीलंकाविरुद्ध 6 सप्टेंबरला दुबईत होणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध 8 सप्टेंबर भारतीय संघ दोन हात करेल.
दुसरीकडे पाकिस्तान संघाला आता अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. पाकिस्तानचा संघ 7 सप्टेंबरला अफगाणिस्तान आणि 9 सप्टेंबरला श्रीलंका संघांशी भिडणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा रडीचा डाव! ‘360 डिग्री’ सूर्यकुमारला उगाच डिवचलं, स्लेजिंगचा व्हिडिओ व्हायरल
हार्दिक अन् पंतवर खूपच तापला कर्णधार रोहित, ड्रेसिंग रूममध्ये संगठच काढला ‘जाळ अन् धूर’
दुसरी बार पाकचा पलटवार! सुपर फोरमध्ये पाकिस्तानची भारतावर मात