एशिया कप (Asia Cup) २०२२ भारतासाठी महत्वपूर्ण आहे. कारण याचवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यामुळे भारताची जोरात तयारी सुरू आहे. मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक झाली. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारती खेळाडू कठोर मेहनत घेत आहेत. या स्पर्धेत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार असून त्याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तसेच विराट कोहलीकडेही मोठा पल्ला गाठण्याची संधी
एशिया कपसाठी भारताचा १५ जणांचा संघ जाहीर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार तर केएल राहुल (KL Rahul) याला उपकर्णधार म्हणून नेमले आहे. विराट कोहली (Virat Kohli) संघात परतला आहे, तर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. तो बाहेर झाल्याने भुवनेश्वर कुमारची जबाबदारी वाढली आहे. भुवनेश्वर नवीन चेंडू आणि डेथ ओवर्समध्ये उत्तम गोलंदाजी करतो. नुकतेच युवा गोलंदाज अर्शदीप सिंग यानेही प्रभावी गोलंदाजीने केली आहे.
रोहितकडे सचिनला मागे टाकण्याची संधी
या स्पर्धेत रोहितकडे एक मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. त्याने या स्पर्धेतील वनडे आणि टी२० प्रकारच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाचवा क्रमांक गाठला आहे. त्याने २७ सामन्यात १ शतक आणि ७ अर्धशतकाच्या सहाय्याने ८८३ धावा केल्या आहेत. तर या यादीत सचिन तेंडुलकरने भारताकडून सर्वाधिक धावा करताना तिसरा क्रमांक गाठला आहे. त्याने २३ सामन्यात २ शतके आणि ७ अर्धशतकाच्या सहाय्याने ९७१ धावा केल्या आहेत. यामुळे रोहितकडे सचिनला मागे टाकण्यासाठी ८९ धावांची आवश्यकता आहे.
रोहित या स्पर्धेत हजार धावा करणारा ठरेल तिसराच फलंदाज
रोहितकडे आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे. एशिया कपच्या इतिहासात १००० धावा फक्त दोनच फलंदाजांनी केल्या आहेत. त्यामध्ये श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसूर्या याने २५ सामन्यात ५३च्या सरासरीने १२२० धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगाकारानेही १००० धावांचा टप्पा गाठला आहे. त्याने २४ सामन्यांत ४९च्या सरासरीने १०७५ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत आता रोहितचा देखील समावेश होऊ शकतो.
धोनी, अझरुद्दिन यांचा विक्रम मोडण्याची संधी
रोहितकडे सर्वाधिक एशिया कप जिंकणारा कर्णधार म्हणून एमएस धोनी आणि मोहम्मद अझरुद्दिन यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. अझरुद्दिन यांनी १९९०-९१ आणि १९९५ विजयी एशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. धोनीने भारताला २०१६ आणि २०१०मध्ये एशिया कप जिंकून दिला आहे. तर रोहितने विजयी २०१८च्या एशिया कप स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. यंदाचीही स्पर्धा भारताने जिंकली तर तो दोन एशिया कप जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरणार आहे.
विराटला देखील मोठा विक्रम करण्याची संधी
विराटने एशिया कपच्या १६ सामन्यात ६४च्या सरासरीने ७६६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील १८३ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे. तो पण या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत १००० आकड्यापर्यंत पोहोचू शकतो.
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO। शांत अन् संयमी पुजाराचा रौद्रावतार पाहिलात का? गोलंदाजाची केलीये कडक धुलाई
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड