थायलंड येथे सुरू असलेल्या 25व्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची ज्योती याराजी चमकली. ज्योतीने महिला 100 मीटर अडथळा शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे तिने सुवर्णपदकाची कामगिरी केली. स्पर्धेतील दुसरा दिवस भारतासाठी खूपच चांगला राहिला. भारताच्या ऍथलिट्सनी 3 सुवर्ण पदके आपल्या नावावर केली. याव्यतिरिक्त एका कांस्य पदकाचाही समावेश आहे. ज्योतीव्यतिरिक्त अजय कुमार सरोज आणि अब्दुल्ला अबुबकर यानेही आपापल्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केली.
ज्योती याराजी (Jyothi Yarraji) हिने महिलांची 100 मीटर अडथळा शर्यत (Women’s 100m Hurdles) 13.09 सेकंदात पूर्ण करत सुवर्ण पदक जिंकले. या शर्यतीतील दुसरे स्थान जपानची मौसमी ओकी हिने पटकावले. तिने ही शर्यत 13.12 सेकंदात पूर्ण केली.
दुसरीकडे, भारतासाठी दुसऱ्या दिवसाचे सुवर्ण पदक 1500 मीटर पुरुषांच्या शर्यतीत आले. यामध्ये अजय कुमार सरोज याने 3.43.51 सेकंदात शर्यत पूर्ण करण्यासोबतच पदक आपल्या नावावर केले. यादरम्यान अजयने जपानच्या युशुकी ताकासी हिला मागे टाकले. तो शर्यतीत 3.42.04 सेकंदासह दुसऱ्या स्थानी राहिला.
Good day. Jyothi Yarraji wins first gold for India in women’s 100m hurdles. She clocks 13.09 secs.
2023 Asian Athletics Championships in Bangkok. pic.twitter.com/Nm5eRfxvdj— Athletics Federation of India (@afiindia) July 13, 2023
अब्दुल्ला अबुबकरने तिहेरी उडीत पटकावले सुवर्णपदक
भारताकडून तिहेरी उडी स्पर्धेत भाग घेणाऱ्या अब्दुल्ला अबुबकर (Abdullah Abubakar) याने 16.92 मीटर उडी मारत स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. दुसऱ्या दिवशी 3 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त भारताच्या खात्यात 2 कांस्य पदकांचाही समावेश आहे. यामध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीत ऐश्वर्या मिश्रा हिने कांस्य पदक पटकावले. तसेच, दुसरे कांस्य पदक डेकॅथलॉन स्पर्धेत तेजस्विन शंकरने 7527 गुण मिळवत आपल्या नावावर केले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने 1 कांस्य पदक आपल्या नावावर केले होते. हे पदक अभिषेक पाल (Abhishek Pal) याने 10 हजार मीटर स्पर्धेत आपल्या नावावर केले होते. (asian athletics championships 2023 track and field athlete jyothi yarraji wins first gold for india womens 100m hurdles bangkok )
महत्वाच्या बातम्या-
भारत-विंडीज मालिकेदरम्यान ICCने बदलला Slow Over Rate नियम, खेळाडूंच्या खिशावर पडणार फरक
शतक ठोकल्यानंतर जयसवालचे ड्रेसिंग रूममध्ये ग्रँड वेलकम; सहकाऱ्यांकडून टाळ्यांचा गजर, तर रोहितने थोपटली पाठ