टी20 विश्वचषक 2024 चा 37वा सामना बांग्लादेश आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. हा सामना सध्या बराच चर्चेत आहे. बांग्लादेशला सुपर 8 मध्ये पोहचण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक होतं. बांग्लादेशनं हा सामना 21 धावांच्या फरकानं जिंकून टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात लहान (106) धावसंख्येचा बचाव केला.
या सामन्यात बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज तंझीम हसन शाकिब आणि नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल यांच्यात बाचाबाची पाहायला मिळाली. यानंतर आता सामन्यादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. वास्तविक, बांग्लादेशच्या फलंदाजांनी डीआरएस वापराताना बेईमानी करत ड्रेसिंग रूममधून मदत घेतली. या दरम्यान पंचाचीही त्यांना पूर्ण साथ दिली.
बांग्लादेशच्या डावाच्या 14व्या षटकात ही घटना घडली. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप लामिछानेनं तंझीम हसन शाकिबला विकेटसमोर पायचीत केलं. यानंतर लामिछानेनं अंपायरकडे अपील केलं असता अंपायरनं बोट वर करून बांगलादेशी फलंदाजाला बाद घोषित केलं.
अंपायरनं बाद दिल्यानंतर तंझीम पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा नॉन-स्ट्रायकवर उभ्या असलेल्या झकर अलीनं ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवून डीएसआरएस घ्यायचा की नाही यावर मत विचारलं. ड्रेसिंग रूममधून सिग्नल मिळाल्यानंतर बांग्लादेशनं रिव्ह्यूची मागणी केली. हे क्रिकेटच्या नियमांच्या विरोधात आहे.
येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, रिव्ह्यू घेण्याची वेळ संपली होती तरीही पंचांनी बांगलादेशचा रिव्ह्यू स्वीकारला आणि तो थर्ड अंपायरकडे पाठवला. जेव्हा तिसऱ्या पंचाला चेंडू विकेटला लागत नसल्याचं आढळलं तेव्हा त्यांनी तंझीमला नाबाद घोषित केलं. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
When Tanzim was out on LBW, Bangladeshi player the non-striker Jaker went to the dressing room to ask for assistance during the DRS call.
How is @ICC able to permit this? Not even the umpire knows about this.even after the allotted time has passed,the third umpire is still used pic.twitter.com/wQXbRzJn5V
— マ ๏Le𝕏乛 (@VK50th) June 17, 2024
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा संघ 19.3 षटकांत अवघ्या 106 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 19.2 षटकांत 85 धावाच करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
सुपर 8 सामन्यांसाठी भारतीय संघात बदल आवश्यक, या मॅचविनर खेळाडूला मिळू शकते संधी
बांग्लादेशच्या गोलंदाजाची नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की, BAN vs NEP सामन्यात मोठा राडा!
नेपाळला धूळ चारत बांग्लादेश सुपर 8 साठी पात्र, नेदरलँडचं स्वप्न भंगलं