बार्सिलोना फुटबॉल क्लबचा स्टार डिफेंडर जेरार्ड पिके याने निवृत्ती जाहीर केली. शनिवारी (5 नोव्हेंबर)अल्मेरियाविरुद्ध तो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. या 35 वर्षीय स्पॅनिश फुटबॉलपटूने 3 नोव्हेंबरला ट्विटरवर पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची माहिती दिली.
जेरार्ड पिके (Gerard Piqué) याने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत त्याचा निवृत्तीची माहिती दिली. त्यामध्ये तो बार्सिलोनाशी संबंधीत माहिती सांगताना दिसत आहे. तो म्हणाला, “मी माझी कारकिर्द संपवण्याचा क्षण निवडला आहे. शनिवारी मी शेवटचा सामना कॅम्प नूमध्ये (Camp Nou) खेळणार आहे. बार्सिलोनानंतर मी कोणत्याही संघात जाणार नाही, मात्र काही दिवसानंतर परणार.”
वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा सदस्य जेरार्ड पिके
जेरार्डचा बार्सिलोनासोबतचा 14 वर्षाचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. त्याने बार्सिलोनासोबत तीन चॅम्पियन्स लीग जिंकल्या आहेत. त्याचबरोबर तो 2010च्या फिफा विश्वचषक आणि 2012च्या युरो कप जिंकणाऱ्या स्पेन संघाचा भाग राहिला. त्याची गणती विश्वातील सर्वोत्तम डिफेंडर्समध्ये होते. त्याने 2018चा विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. त्याने स्पेनसाठी 2009-2018 दरम्यान त्याने 102 सामने खेळले.
बार्सिलोनासाठी पदार्पण आणि क्लबचा 1000वा गोल
जेरार्डने 13 ऑगस्ट 2008मध्ये चॅम्पियन्स लीगमधून पदार्पण केले. विस्ला क्राकोव विरुद्धचा तो सामना 4-0ने जिंकला. तेव्हापासून तो सेंटर बॅकमध्ये पहिली पंसत राहिला. तसेच त्याने क्लबचा 1000वा गोल नोंदवला. त्याने हा गोल 2013-14च्या हंगामात ग्लासगो विरुद्ध केला होता.
Culers, us he de dir una cosa. pic.twitter.com/k3V919pm1T
— Gerard Piqué (@3gerardpique) November 3, 2022
बार्सिलोनासाठी जिंकल्या 8 लालीगा आणि 3 चॅम्पियन्स लीग
जेरार्डने बार्सिलोनासोबत 8 लालीगा, 7 कोपा डेल रे, 3 क्लब वर्ल्ड कप, 3 युरोपियन सुपर कप, 3 चॅम्पियन्स लीग आणि 6 स्पॅनिश सुपर कप जिंकले. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरूवात 2004 मध्ये मॅनचेस्टर युनायटेडसोबत केली. युनायटेड सोबत त्याने एक चॅम्पियन्स लीग, एक प्रीमियर लीग आणि एक इंग्लिश लीग कप जिंकला आहे. बार्सिलोनासाठी त्याने 615 सामने खेळले आहेत. त्याने अनेक गोल डिफेंड करताना 52 गोलही केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घरच्या मैदानावर एफसी गोवाची गाडी रूळावर आली; जमशेदपूर एफसीवर दणदणीत विजय
टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनल आणि फायनलसाठी आयसीसीने बदलले नियम; पाऊस आला तर असा ठरणार विजेता
टी20 वर्ल्डकपमध्ये केन विल्यमसनचीच कॅप्टन्सी भारी! इतिहासात तीन वेळा संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री