भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI AGM) मंगळवारी (18 ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्षपदासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगलाही या बैठकीत मान्यता दिली गेली. त्यामुळे पुढील वर्षी महिला आयपीएलचा पहिला हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
🚨 Update 🚨: 91st Annual General Meeting of BCCI
The 91st Annual General Meeting of the Board of Control for Cricket in India (BCCI) was held on October 18th, 2022, in Mumbai.
The key decisions made are as under 🔽https://t.co/c2XV2W2Opl
— BCCI (@BCCI) October 18, 2022
बीसीसीआयच्या या बैठकीत बीसीसीआयचे नव्हे अध्यक्ष म्हणून माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी यांची वर्णी लागली. त्यासोबत इतरही प्रशासकीय पदांवर विविध नियुक्त्या केल्या गेल्या. याव्यतिरिक्त पुढील वर्षी महिला आयपीएल सुरू होणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले. मात्र, महिला आयपीएलचा फॉरमॅट कसा असेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाच संघ खेळताना दिसतील. हे पाच संघ शक्यतो विभाग वार असण्याची शक्यता आहे. तसेच, सध्या आयपीएलमध्ये ज्या शहरांच्या फ्रेंचायजी आहेत, त्या शहरांव्यतिरिक्त फ्रेंचाइजी दिली जाऊ शकते. तसेच स्पर्धेचे सामने हे शक्यतो सेकंड टियर शहरांमध्ये खेळवले जातील. यासोबतच अंतिम 11 खेळाडूंमध्ये 5 विदेशी खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. यापैकी एक खेळाडू सहयोगी देशांची असेल.
How exciting is this?! The long awaited Women’s IPL is finally a reality 🔥🔥🔥 #IPL2023 https://t.co/wM6MimozZR
— Marizanne Kapp (@kappie777) October 18, 2022
मागील काही वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटपटू तसेच विदेशातील महिला क्रिकेटपटू महिला आयपीएल सुरू करण्याची मागणी करत होत्या. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर दक्षिण आफ्रिकेची अनुभवी क्रिकेटपटू मरीजाने कापने ट्विट करत आनंद व्यक्त केला. यासोबतच काही भारतीय क्रिकेटपटूंनी देखील या निर्णयाचे स्वागत केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमावर विराट, रोहितची नजर! जयवर्धनेची 8 वर्षांची बादशाहत उध्वस्त करण्याची संधी
पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक