बेल्जियम आणि ऑस्ट्रिया संघामध्ये शनिवारी (२४ जुलै) झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रिया संघाला डकवर्थ लूईस नियामानुसार १२ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे बेल्जियम संघाने केवळ १४ धावांवर ८ फलंदाज बाद झाले असतानाही संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे.
त्याचे झालं असे की, या सामन्यात ऑस्ट्रिया संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज अकीब इक्बालने ५ गडी बाद केले, तर साहिल मोमीनने २ गडी बाद केले. त्यांनी आपल्या शानदार गोलंदाजीसह बेल्जियम संघाला अडचणीत टाकले. बेल्जियम संघाने ५.५ षटकांत १४ धावा देऊन ८ गडी गमावले होते. तर या बाद झाल्या ८ खेळाडूंपैकी एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आला नाही. बेल्जियम संघाची अशी परिस्थिती पाहून असा अंदाज लावला जात होता की, संघ २० धावसंख्या देखील करू शकणार नाही. पण या परिस्थितून साबिर जाखीलने शतकी खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले.
साबिरने केले नाबाद १०० धावा
बेल्जियम संघाचे १४ धावांवर ८ गडी बाद झाले होते. तेव्हा ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला साबिर जाखील आणि १० व्या क्रमांकावर आलेला सकलैन अली या दोन्ही खेळाडूंनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी मिळून १३२ धावांची नाबाद भागीदारी केली. साबिरने ४७ चेंडूंचा सामना केला. त्याने ५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. त्याच वेळी सकलैनने साबिरला उत्तम साथ दिली. त्याने ३ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. ऑस्ट्रिया संघातील ७ गोलंदाजांनी प्रयत्न करूनही ही जोडी तुटली नाही.
ऑस्ट्रियाचा संघाला आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयश
बेल्जियम संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रियाची सुरुवात चांगली झाली नव्हती. संघाने ६.१ षटकात ३७ धावा केल्या होत्या तर ३ बळी गमावले देखील होते. त्यानंतर पावसामुळे व्यत्यय आला असल्याने पुढे सामना थांबला होता. त्यामुळे बेल्जियमने डकवर्थ लुईस नियमांत १२ धावांनी विजय मिळविला. यापूर्वी मालिकेच्या पहिल्या सामन्यात बेल्जियमने ऑस्ट्रिया संघाचा ७ गडी राखून पराभव केला होता.
८ व्या क्रमांकावर शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज
साबिर जाखिलने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन विश्वविक्रम केला आहे. ८व्या क्रमांकावर शतक ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या इसरू उदानाने मार्च २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नाबाद ८४ धावांची खेळी केली होती. ८ व्या क्रमांकावर उतरल्यानंतर आतापर्यंत केवळ ६ खेळाडूंना ५० हून अधिक धावांची खेळी खेळता आला आहे.
तसेच साबिर जाखिल आणि सकलेन अलीने ९ व्या विकेटसाठी नाबाद १३२ धावांची भागीदारी केली. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ९ व्या विकेटसाठीही ही सर्वोच्च भागीदारी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पणाच्या टी२० सामन्यात शुन्यावर बाद होऊनही पृथ्वी शॉच्या नावावर ‘मोठे’ विक्रम; रोहितलाही पछाडल
हार्दिक पंड्या गात होता चक्क श्रीलंकन राष्ट्रगीत? व्हिडिओ झाला व्हायरल
श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक करताच सूर्यकुमार यादवच्या नावावर झाला ‘मोठा’ विक्रम; गंभीर, रैनाही पडले मागे