भारतीय कसोटी संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहेत. गेल्या काही महिन्यात भारतीय कसोटी संघाने अनेक अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. यात भारताच्या वेगवान गोलंदाजांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे त्यांचे खूप कौतुकही होत असते. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने नुकतीच भारतीय गोलंदाजांचे तोंड भरून कौतुक केले आहे.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या निवृत्ती नंतररही संघाला वेगवान गोलंदाजांची कमतरता पडणार नाही, असेही ब्रेट ली म्हणाला आहे.
लीने आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्याकडे काही नवीन आणि काही अनुभवी गोलंदाजांची फळी आहे, जी संघाला भक्कम बनवते.
ब्रेट ली म्हणाला, भारतीय संघातील युवा गोलंदाजांकडे गती आहे आणि ते नेहमी जोशात असतात त्यांना पाहणे एक वेगळा अनुभव देणारे असते. हे युवा गोलंदाज पूर्णपणे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीची जागा घेण्यासाठी तयार आहेत.
तो पुढे म्हणला, ऑस्ट्रेलियावरुद्धच्या कसोटी मालिकेत संघातील अर्धे खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे संघातून बाहेत होते. भारतीय संघाने तरीदेखील 2-1 ने मालिका जिंकली होती, याचे पूर्ण श्रेय युवा खेळाडूंना जाते.
ब्रेट लीने 76 कसोटी सामन्यात 310 विकेट्स आहेत. तो पुढे म्हणतो आजच्या काळात सांघिक ताकत (बेंच स्ट्रेंथ) असणं फार महत्त्वाचं आहे. खासकरून जेव्हा संघाला बायो-बबलमध्ये राहायचं आहे.
ब्रेट लीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचेही कौतुक केले. तो म्हणाला, मला चांगल वाटलं की ही स्पर्धा जागतिक पातळीवर खेळली जात आहे. या स्पर्धेमुळे लोकांची कसोटी सामन्यांबद्दलची रुची वाढली आहे. जर तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर तुम्ही मागच्या सप्ताहातील ब्रोडकास्टचे आकडे पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पंतप्रधान मोदी कृपाकरून भारतीय संघाचे सामने पाहू नका’, चाहत्यांची सोशल मीडियावरून मागणी
“भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-० किंवा ३-१ अशी बाजी मारणार”, दिग्गज भारतीय खेळाडूचे भाकीत