संपूर्ण क्रिकेटजगत सध्या टी20 विश्वचषक 2022 साठी उत्सुक आहे. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. 23 नोव्हेंबरला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगेल. तत्पूर्वी सर्व सहभागी संघ तयारीला लागले आहेत. अशात बुधवारी (14 सप्टेंबर) आगामी टी20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. ऍरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात स्वदेशी थीमची जर्सी घालणार आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (Asutralia New Jersey) सोशल मीडियावर टी20 विश्वचषकासाठीच्या (T20 World Cup 2022) जर्सीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाची नवी जर्सी त्यांच्या परंपरेशी जोडलेली आहे. या जर्सीच्या प्लेइंग टॉपच्या ट्रंकवर काळ्या रंगाच्या बाह्या आणि हिरवा व सोनेरी ग्रेडियंट आहे. या जर्सीच्या चहूबाजूंवर कलाकृती रेखाटली गेली आहे. तसेच लाँग स्लीव्ह व्हर्जनमध्ये वरच्या बाहीवर विस्तारित सोनेरी आणि हिरव्या रंगाची कलाकृती दिसेल.
तर पॅंट पूर्णपणे काळ्या रंगाची असेल आणि डोक्यावर घालायच्या टोपीवर आदीवासी आणि टोरेस स्ट्रेट आयलँडर या दोन्ही ध्वजांचे रंग असतील. ऑस्ट्रेलिया संघाचे हे किट आंटी फियोना क्लार्क आणि कोर्टनी हेगन यांनी डिझाईन केले आहे. यापूर्वी या जोडीने ऑस्ट्रेलिया संघाद्वारे घातल्या गेलेल्या स्वदेशी थीमच्या डिझाईनवर एकत्र काम केले होते.
Australia have unveiled their @T20WorldCup 2022 jersey.
More ???? https://t.co/Nunqw46dXC pic.twitter.com/8HDK7UG8nr
— ICC (@ICC) September 14, 2022
It's all in the detail ????????
Proudly unveiling our playing kit for the men's @T20WorldCup
— Cricket Australia (@CricketAus) September 13, 2022
Our men's national team will don a new uniform designed by Kirrae Whurrong woman Aunty Fiona Clarke, in collaboration with Butchulla and Gubbi Gubbi woman Courtney Hagan, when they defend their @T20WorldCup title on home soil next month ❤️???????? pic.twitter.com/Y2aqOzQ5rw
— Cricket Australia (@CricketAus) September 14, 2022
टी20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलिया संघ:
ऍश्टन आगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार), टिम डेविड, ऍरॉन फिंच (कर्णधार), जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा.
टी20 विश्वचषक 2022चा पहिला टप्पा-
गट अ: श्रीलंका, नामिबिया, यूएई, नेदरलँड
गट ब: वेस्ट इंडीज, स्कॉटलँड, आयरलँड, झिम्बाब्वे
सुपर 12 फेरींचा टप्पा-
गट 1: ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड, न्यूजीलंड, ए1, बी2
गट 2: बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बी1, ए2
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बलाढ्य इंग्लंडला नेहमीच पुरून उरलीये मंधाना, टी20तील आकडे पाहून थर्र कापतात विरोधक!
महाराष्ट्राची पोरगी इंग्लंडच्या पठ्ठ्यावर भारी! स्म्रीतीने बड्या विक्रमात जोस बटलरला टाकले मागे
‘रोहितने सलामी सोडून चौथ्या क्रमांकावर खेळावे’; मुंबईकर दिग्गजाची नवी कल्पना