दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने विराट कोहली आगामी मालिकेत वनडे आणि टी20 न खेळल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने थकव्यामुळे ब्रेक घेतला असावा असे त्याने म्हटले आहे. विराट कोहली कसोटी आणि वनडेमध्ये खेळेल अशी आशा डिव्हिलियर्सने व्यक्त केली आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटसाठी संघांची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला टी20 आणि केएल राहुल (KL Rahul) याची वनडेमध्ये कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी संघाची कमान सांभाळणार आहे. पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यालाही या दोन्ही मालिकेत स्थान मिळालेले नाही.
एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना विराट कोहलीच्या भविष्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला आशा आहे की, तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळत राहील. मला खात्री आहे की त्याच्याकडे नक्कीच काहीतरी योजना असेल. तो थकला असेल हे यामागचं एक कारण असू शकतं. तो किती वेळ खेळेल हे मला माहीत नाही पण त्याने शक्य तितक्या वेळ खेळावे अशी माझी इच्छा आहे. त्याची फलंदाजी पाहणे खूप छान आहे आणि त्याने आणखी खेळावे अशी आमची इच्छा आहे. दक्षिण आफ्रिकेची मालिका त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. स्वत:ला वेळ देण्यासाठी तो काही सामन्यांतून विश्रांती घेऊ शकतो आणि नंतर खेळू शकतो.”
विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली विश्रांतीवर आहेत. आता हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घेणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी त्यांचा शेवटचा टी20 सामना गेल्या वर्षी टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळला होता. (De Villiers upset over Kohli not playing ODIs and T20s against Africa Said As much as he could)
महत्वाच्या बातम्या
दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं विधान; म्हणाला, ‘मी फक्त रिंकूसाठी…’
नागराज मंजुळेंनी शड्डू ठोकला! बहुचर्चित ‘खाशाबा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात