जागतिक क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक दिग्गज फिरकीपटू आहेत. या फिरकीपटूंमध्ये भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल याचीही गणना होते. एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली चहलने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो आतापर्यंत चार कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. अशात जेव्हा त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी या कर्णधारांमधील फरक विचारला गेला, तेव्हा त्याने मन जिंकणारे उत्तर दिले.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा 33 वर्षीय असून एमएस धोनी (MS Dhoni) याच्याव्यतिरिक्त विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या नेतृत्वाखाली खूप क्रिकेट खेळला आहे. तसेच, तो वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर टी20 मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा भाग आहे.
चहलने दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मी याकडे असे पाहतो की, तुमच्या कुटुंबात 4 भाऊ आहेत. मोठा भाऊ माही भाई, त्यानंतर विराट, रोहित आणि आता हार्दिक आले. समीकरण तेच राहते. काहीच बदलत नाही. मैदानावर प्रत्येकाला वाटते की, त्याचा संघ जिंकावा. एक गोलंदाज म्हणून ते आम्हाला स्वातंत्र्य देतात. जे स्वातंत्र्य आम्हाला आधी मिळायचे, तेच स्वातंत्र्य आम्हाला आता हार्दिक देत आहे. आम्ही (गोलंदाज) आमची फील्ड स्वत: ठरवू शकतो.”
पुढे बोलताना चहल असेही म्हणाला की, “एवढंच नाही, तर हार्दिकसुद्धा गोलंदाजांचा कर्णधार आहे. जर आमची योजना उपयोगी पडली नाही, तर तो मार्गदर्शन करतो. त्यामुळे जेव्हाही नेतृत्वाची गोष्ट येते, तेव्हा काहीच बदलत नाही. गोलंदाजाला नेहमी कर्णधाराकडून ते स्वातंत्र्य मिळते, ज्याची त्याला गरज असते.”
मागील काही काळापासून चहल भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. मात्र, त्याला संघातील संयोजनामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये बाहेर बसावे लागते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दुसरीकडे, पहिल्या टी20 सामन्यात त्याने 3 षटके गोलंदाजी करताना 24 धावा कर्च करत 2 विकेट्स घेतल्या. अशात तो पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (difference between the captaincy of ms dhoni virat kohli rohit sharma and hardik pandya yuzvendra chahal gave this answer)
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार पाकिस्तानचे निवृत्त खेळाडू, अनेक दिग्गजांचा असणार समावेश
भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या ईशांतला ‘या’ धुरंधराने दिला सर्वात जास्त त्रास, स्वत:च सांगितले नाव