आयपीएल २०२०च्या साखळी फेरीतील अंतिम सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) शारजाहच्या मैदानावर झाला. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या या सामन्यात प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू जीवाचे रान करताना दिसले. मात्र मुंबईच्या फलंदाजांनीही त्यांना काट्याची टक्कर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एक चाहता मुंबईच्या क्विंटन डी कॉकने मारलेला चेंडू घेऊन पळून जात असल्याची मजेशीर घटना पाहायला मिळाली.
झाले असे की, सामन्यापूर्वी हैदराबादचा कर्णधार नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र पहिल्या ३ षटकांच्या आतच मुंबईने कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. मात्र यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक सूर्यकुमार यादवसोबत मिळून संघाचा डाव पुढे नेत होता.
डावातील ५वे षटक टाकण्यासाठी आलेल्या संदीप शर्माच्या गोलंदाजीवर तर त्याने १ चौकार आणि सलग २ षटकार लगावले. दरम्यान डी कॉकने दूसऱ्या चेंडूवर मारलेल्या षटकाराचा चेंडू तर स्टेडियमबाहेर जाऊन पडला. परंतु सामन्याची सुरुवात झाल्यापासूनच चाहत्यांनी चेंडू घेण्यासाठी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे एका चाहत्याने चपळतेने डी कॉकने टोलवलेला तो चेंडू घेतला. आणि दुसरा कोणी चेंडू हिसकावून घेईल या भीतीने धावत सुटला.
https://twitter.com/Sushil9917172/status/1323642940908974085?s=20
https://twitter.com/ipl2020highlite/status/1323643022152663040?s=20
असे असले तरी, संदीप शर्माने पुढे ४.४ षटकात डी कॉकचा त्रिफळा उडवला. त्यामुळे १३ चेंडूच केवळ २५ धावा करत डी कॉक पव्हेलियनला रवाना झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
पावरप्लेमध्ये SRHच्या गोलंदाजाची कमाल; झहीर खानसारख्या दिग्गजालाही टाकले मागे
क्रिकेटपेक्षा खेळाडूचा जीव महत्त्वाचा; ‘त्या’ चित्तथरारक घटनेनंतर सचिनची आयसीसीला मोठी विनंती
गुड न्यूज.! हैदराबादविरुद्ध हिटमॅन मैदानात, रोहित शर्माची विरोधकांना जोरदार चपराक
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?