जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याकडे पाहिले जाते. दोन्ही संघातील सामने अत्यंत अटीतटीचे होतात तसेच, दोन्ही संघांनी सर्वाधिक वेळा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले आहे. या दोन्ही संघांमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असतो.
आज आपण अशा पाच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत जे यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होते. मात्र, आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्वा करताना दिसतील.
१) अंबाती रायुडू-
सध्या चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज असलेला अंबाती रायुडू यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य घटक होता. २०१० ते २०१७ या आठ वर्षात त्याने मुंबईला तीन वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१८ पासून तो धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघात खेळतोय. २०१८ मध्ये चेन्नईला विजेते बनवण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
२) ड्वेन ब्रावो-
वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्रावो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो. ब्रावो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तो २०११ पासून चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करत असून, चेन्नईच्या रणनितीचा सर्वात महत्वपूर्ण भाग मानला जातो. ब्रावो २००८ ते २०१० या काळात मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता.
३) कर्ण शर्मा-
दोन आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेला अनुभवी लेगस्पिनर कर्ण शर्मा हा २०१८ पासून चेन्नईसाठी आपले कौशल्य दाखवत आहे. आत्तापर्यंत बर्याच आयपीएल संघांमध्ये खेळलेला कर्ण २०१७ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळलेला. रायझिंग पुणे सुपरजायंट विरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती.
४) जोस हेझलवूड-
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड हा २०१४-२०१५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्यानंतर, २०२० आयपीएल पासून तो चेन्नई संघासाठी आपले कौशल्य दाखवत आहे. सध्या तो चेन्नई संघातील सर्वात अनुभवी वेगवान आंतरराष्ट्रीय गोलंदाज मानला जातो.
५) कृष्णप्पा गौतम-
आयपीएल २०२१ च्या लिलावात ९ कोटींपेक्षा अधिकचा बोली मिळवून चेन्नई संघाचा भाग झालेला कर्नाटकचा अनुभवी अष्टपैलू कृष्णप्पा गौतम हा २०१७ आयपीएलवेळी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र, त्यावेळी त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटने टी२०चे नेतृत्त्वपद सोडणे टीम इंडियाच्या येणार अंगाशी, ‘या’ गोष्टींमध्ये होऊन बसणार अवघड
विराटसारखा टी२० कर्णधार शोधून सापडणार नाही, ‘हे’ ५ अद्भुत विक्रम केले आहेत नावावर
सीएसकेविरुद्धच्या मोठ्या लढतीपूर्वी ‘हिटमॅन’ने बदलला गियर, क्वारंटाईन संपवून सुरू केला सराव