इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला जॉस बटलरने चांगली फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याला सोबत म्हणून पहिले यशस्वी जयस्वाल आणि नंतर कर्णधार संजू सॅमसनने देखील चांगली साथ दिली. पण नंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजी करायला आला आणि त्याने राजस्थानच्या फलंदाजांना चितपट करण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र सामन्यात सर्वात जास्त गाजलं ते म्हणजे शिमरॉन हेटमायरचा बळी घेतल्यानंतरचे हार्दिकचे सेलिब्रेशन.
सामन्याच्या १५ व्या षटकच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिकने चेंडूची गती कमी करत हेटमायरला चकित करण्याचा प्रयत्न केला. हार्दिकच्या या प्रयत्नाला यश आले आणि चेंडू सरळ हवेत गेला. त्यावर हार्दिकनेच झेल घेत आपला स्पेल चांगल्या रितीने समाप्त केला. मात्र खरी गंमत घडली ती झेल घेतल्यानंतरच्या सेलिब्रेशनवेळी. हार्दिकने झेल घेतल्यानंतर कोणत्याही खेळाडूकडे न जाता थेट लेग अंपायरकडे धाव घेतली आणि खेळीमेळीच्या वातावरणात अंपायरच्या मांडीवर मारत सेलिब्रेशन केले. हार्दिकच्या या सेलिब्रेशन नंतर मात्र सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पाडला.
Hardik pandya celebrating with umpire
Mumbai indians mentality 👌🔥— vaibhav hatwal2 ◟̽◞̽ 🤧 (@vaibhav_hatwal2) May 29, 2022
https://twitter.com/Adityakrsaha/status/1530940907939213312
Hardik Pandya with the celebration with the umpire😂😂😂 #CricketTwitter #IPLFinals
— Keval Raval (@kevalraval303) May 29, 2022
https://twitter.com/kannansanjay002/status/1530940995470520320
दरम्यान, हार्दिकने या सामन्यात गोलंदाजीमध्ये आपली चमक दाखवत ४ षटकांत केवळ १७ धावा देत ३ बळी घेतले. यामध्ये जॉस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांचा समावेश आहे. हार्दिक आयपीएल फायनलनमध्ये विकेट घेणारा केवळ दुसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना डेक्कन चार्जर्स विरुद्ध १६ धावा देत ४ बळी घेतले होते.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाटी क्लिक करा
हेही वाचा
जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम
कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला