भारतीय संघाने मागील सामन्यातील खराब कामगिरी विसरून दुसर्या सामन्यात शानदार पुनरागमन केले. ज्यामुळे भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया सोबत बरोबरी केली. त्यामुळे या सामन्याच्या विजयाने अश्विनला खूपच आनंद झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा केली आहे.
भारतीय संघाचा फिरकीपटू आर. अश्विनने दुसर्या कसोटी सामन्यात खूप महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाने 8 विकेट्सने हा सामना जिंकला. अश्विनने आपले फिरकीचे जाळे टाकत ऑस्ट्रेलिया संघाचे दोन्ही डावात 5 गडी बाद केले .त्याने पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ, टीम पेन आणि मॅथ्यू वेड यांना बाद केले. त्याचबरोबर दुसर्या डावात जोश हेझलवूड आणि मार्नस लाब्यूशाने यांना तंबूत धाडले.
या विजयानंतर अश्विनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या संघातील खेळाडू सोबतचा एक फोटो शेअर केला आणि यामधे त्याने नवोदित खेळाडू मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांची स्तुती करताना लिहिले आहे. “जेव्हा तुमची पाठ भिंती समोर असते. तेव्हा मागे टेकून भिंतीच्या आधाराचा आनंद घ्या!! संपूर्ण संघाचे अभिनंदन. शानदार विजय होता.” आणि यामधे मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल विशेष यांचा उल्लेख केला आहे.
When your backs are up against the wall, lean back and enjoy the support of the wall!! Well done to the entire team and what a win that was💯🔥🔥🔥🥳🥳.
Special mention to Mohd Siraj and @RealShubmanGill 👏👏..@ajinkyarahane88 @cheteshwar1 @Jaspritbumrah93 @y_umesh @imjadeja pic.twitter.com/4t8IlxZFlW— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) December 29, 2020
त्याचबरोबर अश्विनची पत्नी प्रिथीने अश्विनने भारतीय संघाला विजयाच्या देताना अश्विनचे ट्विट पुन्हा ट्विट करताना शुभेछा दिल्या आहेत. प्रिथीने त्याचबरोबर एक खुलासा करताना म्हणाली, मी अश्विनला यापूर्वी कधी एवढे आनंदी बघितले नाही, जेवढा त्याला मेलबर्न कसोटी सामन्यात विजय मिळविल्यानंतर आनंदी झाल्याचे बघितले.
“मी अश्विनला प्रत्येक कसोटी सामन्यानंतर बघितले आणि त्यावर चर्चा सुद्धा केली आहे. परंतु जवळपास 10 वर्षांनंतर त्याच्या डोळ्यात एवढा आनंद, समाधान आणि चमक यापूर्वी कधीही पाहिली नाही.”
https://twitter.com/prithinarayanan/status/1343866386292953088?s=19
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सुरू होणार आहे. हा सामना सिडनी किंवा मेलबर्न येथे खेळला जाईल. त्यानंतरच चौथा कसोटी सामना 15 जानेवारीला सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– ब्रेकिंग: भीषण अपघातातून बालंबाल बचावले मोहम्मद अझरुद्दीन, गाडीचा झाला चक्काचूर
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय