आयपीएलचा १३ वा हंगाम सुरू होण्यास आता फक्त काही दिवसच शिल्लक आहेत. पण हा मोसम भारताऐवजी युएईमध्ये यंदा १९ सप्टेंबरपासून खेळला जाईल. अशा परिस्थितीत स्फोटक खेळाडू मैदानात येण्यास आतुर आहेत. कारण आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे जिथे एखादा खेळाडू जबरदस्त कामगिरी दाखवतो आणि लवकरच क्रिकेट विश्वात आपली नवीन ओळख बनवतो. या स्पर्धेत असे बरेच खेळाडू आहेत जे लांब षटकार ठोकून वादळी खेळी साकारतात.
या लेखात ४ वेळा आयपीएल विजेता झालेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या तीन खेळाडूंविषयी जाणून घेऊ, जे या मोसमात युएईमध्ये शतक ठोकू शकतील.
१. ख्रिस लिन (Chris Lynn)
ख्रिस लिनने याआधी आयपीएलमध्ये अनेकदा कोलकाता नाईट रायडर्ससाठी स्फोटक सुरुवात केली होती. २०११-१२ मध्ये डेक्कन चार्जर्समध्ये रुजू झालेल्या ख्रिस लिनला त्या वेळी खेळण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. परंतु २०१४ मध्ये कोलकाताने ख्रिस लिनला लिलावात विकत घेतले. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा हा स्फोटक सलामीवीर मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. त्याला मुंबईने आयपीएल २०२० साठी खेळाडूंच्या लिलावात खरेदी केले आहे.
लिनने आयपीएल कारकीर्दीत ४१ सामन्यात १४०.६५ च्या स्ट्राइक रेटने १२८० धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक ९३ धावा केल्या आहेत. या हंगामात मुंबई इंडियन्स त्याच्यासाठी 2 कोटींची रक्कम मोजली आहे. लिनची खेळण्याची शैली पाहता असे म्हणता येईल की आयपीएल २०२० मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून शतक ठोकू शकेल. लिन मागील काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्येही आहे.
२. रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारतीय क्रिकेट संघाचा ‘हिटमन’ रोहित शर्माने शतक ठोकले तर आश्चर्य वाटणार नाही. गेल्या काही वर्षांपासून रोहितच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. रोहितने आयपीएल कारकीर्दीत खेळलेल्या १८८ सामन्यात १३०.८२ च्या स्ट्राइक रेटने एकूण ४८९८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या फलंदाजीतून अनेक स्फोटक खेळी बघायला मिळाल्या. परंतु तो केवळ एकच शतक ठोकू शकला आहे. २०१२ च्या आयपीएलमध्ये रोहितने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ६० चेंडूंत १०९ धावांची नाबाद खेळी केली.
मागील हंगामात खेळलेल्या १५ सामन्यात त्याने ४०५ धावा केल्या. यादरम्यान त्याने वेगवान खेळीदेखील खेळल्या, पण त्याला शतक करता आले नाही. पण रोहितचा मागील काही महिन्यातील हंगाम पाहिला तर यावेळी तो शतक ठोकू शकतो असे म्हणता येईल.
३. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
मुंबई इंडियन्सकडून शतक ठोकण्याची क्षमता असलेला सूर्यकुमार यादव हा तिसरा फलंदाज आहे. यादव आपल्या वेगवान फलंदाजीने शतक ठोकू शकतो. तसेच मुंबई संघात आल्यापासून त्याची कामगिरीही चांगली झाली असल्याचे सिद्ध झाले आहे. मागील हंगामात त्याने १६ सामन्यांत ४२४ धावा केल्या. त्याची सर्वाधिक धावसंख्या ७१ अशी होती.
सूर्यकुमार यादवने आयपीएल कारकीर्दीत ५५ सामने खेळले असून १३१.६१ च्या स्ट्राईक रेटने त्याने एकूण ६१२ धावा केल्या आहेत. या काळात त्याचा सर्वोत्तम खेळी ७२ धावांची आहे. त्याला अद्याप एक शतकही करता आले नसले तरी सूर्यकुमार यादवची खेळण्याची शैली पाहता तो आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्ससाठी शानदार शतक ठोकू शकतो असे म्हणता येईल.
ट्रेंडिंग लेख –
वनडे सिरीज म्हटले की ‘हे’ ३ कर्णधार हिरो ठरणारच, पहा काय आहेत कारनामे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
महत्त्वाच्या बातम्या –
‘बीसीसीआय लाज वाटू द्या, बॉयकॉट आयपीएल’, गांगुली खातोय चाहत्यांच्या शिव्या
चेन्नई सुपर किंग्जला मिळालेले यश हे केवळ या खेळाडूमुळे, राहुल द्रविडने सांगितले नाव
चेन्नई सुपर किंग्जचे संकट वाढले, दुबईला जाणे झाले कठीण