भारताचे माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांना वाटते की, आयपीएल २०२०चे आयोजन दुबईमध्ये केले जाऊ शकते. वासन यांनी सांगितले आहे की, भारताचा कर्णधार विराट कोहलीदेखील असाच विचार करतो. स्पोर्ट्सकिडावर एका लाइव्ह चॅटदरम्यान वासन यांनी सांगितले की, कशाप्रकारे आयपीएलचे आयोजन सप्टेंबरमध्ये दुबईमध्ये होऊ शकते. IPl 2020 May Be Shifted To Delhi Said Atul Wassan
वासन म्हणाले की, “आता लोक याविषयी विचार करत आहे. मीदेखील काही खेळाडूंना याविषयावर बोललो होतो. यामध्ये विराटचा समावेश होता. सर्वांचे म्हणणे होते की, आयपीएलचे आयोजन सप्टेंबरमध्ये दुबईत केले जावे. मला वाटते की, सर्वांचे लक्ष कदाचित दुबईवरच आहे.”
“कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या १३व्या हंगामाबाबतीत अनेक तर्क लावण्यात आले आहेत. दुबईसारख्या शहरात आयपीएलचे आयोजन करणे उत्तम असेल. कारण इथे खेळाडूंना स्टेडियमपर्यंत जाण्यासाठी जास्त प्रवास करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे खेळाडू सुरक्षित राहतील.”
देशांतर्गत क्रिकेटविषयी विचारण्यात आल्यावर वासन म्हणाले की, “देशांतर्गत क्रिकेट म्हणजे रणजी ट्रॉफीचे आयोजन करणे अवघड आहे. कारण, यामध्ये अनेक संघ भाग घेतात आणि अनेक सामने होतात. तसेच खेळाडूंना खूप प्रवास करावा लागतो. त्यासाठी त्यांच्या विमानप्रवासाचा खर्च येतो. म्हणून देशांतर्गत क्रिकेटचे आयोेजन अशक्य वाटत आहे. शिवाय सामने झाल्यास ते त्यांच्या प्रदेशामध्येच घ्यावे लागतील,” असेही वासन म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
मलाही भारतीय टी-२० संघात घ्या; निवड समितीकडे ‘हा’ ४०…
सील बाॅर्डर क्राॅस करुन भाजप खासदार क्रिकेट खेळण्यासाठी हरियाणात
क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! जूलैमध्ये होऊ शकते ही कसोटी मालिका