इंडियन प्रीमियर लीगमधील सनराइजर्स हैदराबाद संघाने जागतिक संगीत दिवस अनोख्या अंदाजाच साजरा केला आहे. या दिनानिमित्त हैदराबाद संघातील एका युवा खेळाडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर संघातर्फे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत जो खेळाडू गाणे म्हणत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून अब्दुल समद आहे. त्याचा आवाज कोणत्याही गायकापेक्षा कमी नाही. या खेळाडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अब्दुल समद हैदराबाद संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. अब्दुल हा मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. अब्दुलचा गाणे म्हणत असल्याचा व्हिडिओ शेअर करताना हैदराबादने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “जागतिक संगीत दिनानिमित्त (#WorldMusicDay) आमची इन- हाऊस प्रतिभा.” चाहते हा व्हिडीओ पाहून त्याचे खूप कौतुक करत आहेत.
On #WorldMusicDay, presenting our in-house talent 😍🎶@ABDULSAMAD___1 #OrangeArmy #OrangeOrNothing pic.twitter.com/MD6AjKt0fe
— SunRisers Hyderabad (@SunRisers) June 21, 2021
अब्दुल समद आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळतो. तो फलंदाजीसोबतच गोलंदाजीही करतो. अब्दुलची सर्वांना ओळख तेव्हा झाली, जेव्हा त्याने 2019-20 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये गुजरातच्या विरुद्ध 53 चेंडूमध्ये 68 धावा केल्या. तसेच आयपीएल 2020 दरम्यान देखील त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, 2021 हंगामात त्याला खास काही करता आले नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 ला 29 सामन्यांनंतर स्थगिती देण्यात आली होती. पण आता हा उर्वरित हंगाम येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. हा हंगाम स्थगित होण्यापूर्वी हैदराबाद संघ फार उत्कृष्ट प्रदर्शन करू शकला नाही. याचदरम्यान संघाचा कर्णधारदेखील बदलण्यात आला. डेव्हिड वॉर्नरच्या जागी केन विलियम्सनला कर्णधारपद देण्यात आले.
सनराइजर्स हैदराबादकडून खेळताना अब्दुल समदला डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियम्सन यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याचा आणि ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली. अब्दूलने अनेक सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने दाखवून दिले की, येणाऱ्या काळात तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो.
2020 च्या आयपीएलमध्ये लिलावादरम्यान जम्मू-काश्मीरचा एकमेव खेळाडू म्हणून अब्दुल समदला निवडण्यात आले होते. सनराइजर्स हैदराबाद संघाने त्याला 20 लाखांच्या किमतीमध्ये खरेदी केले होते. रणजी ट्रॉफीमध्ये अब्दुलने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ अफलातून! जबरदस्त क्षेत्ररक्षणाने जिंकली न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मने, पाहा व्हिडिओ