इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची सुरुवात शानदार झाली आहे. आयपीएलच्या ११ वा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. पंजाबने सीएसकेला ५४ धावांनी पराभूत केले. पंजाबचा हा दुसरा विजय असून संघाने पहिला समना राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध जिंकला आहे आणि दुसऱ्या सामन्यात संघाला कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केले. चेन्नईविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील शानदार विजयानंतर पंजाब संघातील खेळाडूंनी नाच-गाणे करुन आनंद साजरा केला आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्सच्या ट्वीटर आकाऊंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संघातील खेळाडू नाचताना दिसत आहेत. ड्रेसिंग रुममध्ये संघाचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि विजयाचा हिरो ठरलेला लियाम लिविंगस्टोन डान्स करत पंजाबी गाणे गाताना दिसले. या दरम्यान पंजाब किंग्सचे खेळाडू राहुल चाहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा सुद्धा दिसत आहेत.
Singing Kings! 🎶#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #CSKvPBKS pic.twitter.com/uNUPVR0bm1
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 3, 2022
आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत पंजाब संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर राजस्थान राॅयल्स पहिल्या क्रमांकावर आहे, ज्या संघाने आपले दोनही सामने जिंकले आहेत. तसेच सीएसके नवव्या क्रमांकावर आहे. आयपीएल इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की, सीएसकेला पहिल्या तिनही सामन्यात अपयश आले आहे.
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करत पंजाबने २० षटकात ८ विकेट्स गमावत १८० धावा केल्या. लिविंगस्टोनने सर्वाधिक ६० धावा केल्या. पंजाबच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई संघ १८ षटकातच १२६ धावा करत सर्वबाद झाला आणि हा सामना पंजाबने ५४ धावांनी जिंकला. ब्रावो आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
पंजाबकडून वैभव अरोरा आणि जितेश शर्मा या दोन खेळाडूंनी पदार्पण केले. या दोघांनी सुद्धा आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. जितेशने १७ चेंडूत २६ धावा केल्या. तसेच त्याने यष्टीरक्षक म्हणून धोनी आणि अंबाती रायुडू यांच्या विकेट्स घेतल्या. वैभवने ४ षटकात २१ धावा दिल्या आणि २ विकेट्स आपल्या नावे केल्या. वैभवने राॅबिन उथप्पा आणि मोईन अलीला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबच्या यष्टीरक्षकाने पदार्पणातच दाखवली हुशारी अन् बाद झाला धोनी, पाहा Video
IPL 2022| चेन्नईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर ‘मिस्टर आयपीएल’ चर्चेत; रैनाच्या पुनरामनाची होतेय मागणी
ऋतुराजच्या ३ सामन्यांत केवळ २ धावा; कर्णधार जडेजा म्हणतोय, ‘आम्हाला सर्वांना माहीत आहे की…’