बुधवारी (२५ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युवा फलंदाज रजत पाटीदार याने एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकले. लखनऊविरुद्धच्या या सामन्यात आरसीबीने १४ धावांनी विजय मिळवला. पाटीदार या सामन्यात सामनावीर ठरला. शतकी खेळीनंतर त्याचे नाव प्रत्येक चाहत्याच्या तोंडात उच्चारले गेले. परंतु, या युवा फलंदाजासोबत एलिमिनेटर सामन्याच्या आधी एक हास्यास्पद घटना घडली होती, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
रजत पाटीदार (Rajat Patidar) लखनऊविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा ठोकल्या. यादरम्यान अवघ्या ४९ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले, जे चालू हंगामातील सर्वात वेगवान शतक देखील ठरले. आयपीएल प्लेऑफमध्ये शतक करणारा पाटीदार पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. परंतु या गुणवंत खेळाडूला एलिमिनेटर सामन्याच्या आधी बहुतांशजण ओळखत देखील नव्हते.
आरसीबीने साखळी फेरीतील शेवटचा सामना गुजरात टायटन्ससोबत खेळला होता. याच सामन्यात पाटीदारसोबत एक हास्यास्पद प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने या सामन्यात अप्रितम ७३ धावांची खेळी केली होती. आरसीबीने हा सामना ८ विकेट्सने जिंकला. हा विजय आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी महत्वाचा होता. याच कारणास्तव विजयानंतर आरसीबीचा पूर्ण संघ आनंद साजरा करू लागला. खेळाडू एकमेकांच्या गळाभेटी घेत होते.
सर्वजण आनंदात असताना रजत पाटीदार मात्र एकटा पडल्याचे पाहायला मिळाले. त्याने संघातील सहकाऱ्यांशी हात मिळवण्यासाठी हात वर केला, पण त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. याच कारणास्तव त्याने वरती केलेल्या हाताने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. या मजेशीर प्रसंग कॅमेरामॅनने अगदी अचूक पकडला. व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत.
— crictalk (@crictalk7) May 26, 2022
दरम्यान, आरसीबीने एलिमिनेटर सामन्यात लखनऊला मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांना अजून एक सामना जिंकावा लागणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला मात दिली होती. आता राजस्थान आणि आरसीबी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आमने सामने असतील. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एलिमिनेटर सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आरसीबीच्या दिनेश कार्तिकला दंड, कारण गुलदस्त्यात
IPL | कशी आहे नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी, जिथे रंगणार क्वालिफायर आणि फायनलचा थरार; घ्या जाणून
आयपीएल संपल्या-संपल्या भारतीय संघ जाणार श्रीलंका दौऱ्यावर; जूनमध्ये होणार ‘या’ मालिका