लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेचा चौथा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जार्वो नावाचा क्रिकेट चाहता मैदानात घुसलेला दिसला. जार्वो हा चालू इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेदरम्यान मैदानात घुसण्याची ही तिसरी वेळ आहे.
जार्वो तिसऱ्यांदा घुसला मैदानात
ओव्हल कसोटीदरम्यान इंग्लंडच्या पहिल्या डावात ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत होते, त्यावेळी ३४ व्या षटकावेळी जार्वो अचानक मैदानात आला. हे षटक भारताकडून उमेश यादव टाकत होता. उमेश या षटकातील तिसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत होता, त्याचवेळी त्याला मागून ६९ क्रमांकाची भारताची जर्सी घातलेला जार्वो येताना दिसला.
जार्वो यावेळी जोरात धावत आला आणि गोलंदाजी करण्याची कृती करु लागला. यावेळी तो बेअरस्टोला देखील जोरात जाऊन धडकला. बेअरस्टोला याबाबत कसलीच कल्पना नसल्याने तो या धक्क्याने चकीत झाला. या घटनेमुळे काहीवेळ सामना थांबला होता.
जार्वो हा यापूर्वी लॉर्ड्स, तसेच हेडिंग्ले कसोटीतही मैदानात घुसला होता. लॉर्ड्स कसोटी दरम्यान तो क्षेत्ररक्षण करण्याच्या हेतूने, तर हेडिंग्ले कसोटी दरम्यान बॅट घेऊन मैदानात उतरला होता. त्याच्या या कृतीमुळे इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Jarvo again!!! Wants to bowl this time 😂😂#jarvo69 #jarvo #ENGvIND #IndvsEng pic.twitter.com/wXcc5hOG9f
— raghav (@raghav_padia) September 3, 2021
https://twitter.com/SmilesOLife/status/1433768345409507331
यॉर्कशायर क्रिकेटने केली होती कारवाई
हेडिंग्ले मैदान हे यॉर्कशायर काउंटी संघाचे घरचे मैदान आहे. तिसरा सामना संपल्यानंतर यॉर्कशायर क्रिकेटने मैदानात घुसलेल्या जार्वोवर कारवाई केल्याचे सांगितले होते. त्यांनी जार्वो याला आर्थिक दंड तसेच आयुष्यभर या मैदानावर न येण्याची कारवाई केली. सुरक्षा नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई केल्याचे यॉर्कशायर क्रिकेटकडून सांगितले गेले होते.
JARVO 69, multitalented player for India:
2nd Test – comes to field
3rd Test – comes to bat
4th Test – comes to bowl#jarvo69 #IndvsEng pic.twitter.com/kwCHegNssh— sohom (@AwaaraHoon) September 3, 2021
भारताचा पहिला डाव १९१ वर संपुष्टात
ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून शार्दुल ठाकूरने ५७ आणि कर्णधार विराट कोहलीने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर, इंग्लंडचीही पहिल्या डावातील सुरुवात फारशी चांगली झाली नाही. इंग्लंडने ६२ धावांत ५ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर पोप आणि बेअरस्टोने इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेरपर्यंत इंग्लंडला ५ बाद १३९ धावा करुन दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयर्लंडची ऐतिहासिक कामगिरी, झिम्बाब्वे संघाला पराभूत करत टी२० मालिका घातली खिशात
टी२० विश्वचषकात रोहित घेणार कर्णधार विराटची जागा? हेड कोच शास्त्रींनी दिले ‘असे’ उत्तर