इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर चांगलीच पकड मिळवली असून, अखेरच्या दिवशी भारतीय संघाला जिंकण्यासाठी केवळ १५७ धावा हव्या आहेत.
भारतीय संघ या सामन्यात आघाडीवर असला तरी, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत यजमान संघाला बॅकफूटवर आणले. सामन्यात ९ बळी मिळवत त्याने अनेक विक्रमांना देखील गवसणी घातली. इंग्लंडच्या धर्तीवर एक खास कामगिरी करणारा तो अवघा तिसरा भारतीय गोलंदाज बनला.
बुमराहने केली अशी कामगिरी
सध्या जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या बुमराहने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील अपयश विसरून या मालिकेची दमदार सुरुवात केली. त्याने पहिल्या डावात ४ इंग्लिश फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर, दुसऱ्या डावात त्याहून जबरदस्त गोलंदाजी करत त्याने पाच बळी टिपले. यासोबतच तो इंग्लंडच्या भूमीवर एकाच सामन्याच्या दोन्ही डावात चार किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला.
यांनी केली होती अशी कामगिरी
इंग्लंडच्या भूमीवर दोन्ही डावात चार किंवा चारपेक्षा अधिक बळी घेणारा पहिला गोलंदाज होण्याचा मान चेतन शर्मा यांना मिळाला होता. शर्मा यांनी १९८६ बर्मिंघम कसोटीच्या पहिल्या डावात ४ व दुसऱ्या डावात ६ बळी घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली होती. राहुल द्रविडच्या नेतृत्वात २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान याने याच नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानवर पहिल्या डावात ४ व दुसऱ्या डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केलेली.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेचा मोठा निर्णय! सुवर्ण विजेत्या नीरजला देणार एक कोटी आणि ‘ही’ खास भेट
भारताविरुद्ध खणखणीत वाजणारे नाणं म्हणजे जो रूट, एकदा हे आकडे पाहा सर्व समजून जाल
बीसीसीआयची मोठी घोषणा, ऑलिम्पिक विजेत्यांना देणार ‘इतक्या’ रकमेचे रोख पारितोषिक