भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रमुख फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज सोमवारी (5 सप्टेंबर) आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिला या वाढदिवसादिनी अनेक क्रिकेट चाहते तसेच संघांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनेही (MI) जेमिमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने या शुभेच्छांचा स्वीकार करत एक मजेदार रिप्लाय ही दिला.
मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून जेमिमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर जेमिमाने केलेला रिप्लाय चांगलाच व्हायरल होत आहे. तिने लिहिले,
‘धन्यवाद. आणखी एक चांगले होईल की तुम्ही मला महिला आयपीएलसाठी मला खरेदी करा. मी फक्त बोलतेय.’
To one of the most vibrant cricketers with immense talent 💯🙌
Happy Birthday, Jemi 🎂💙#OneFamily @JemiRodrigues @BCCI pic.twitter.com/WnN65kkRM3
— Mumbai Indians (@mipaltan) September 5, 2022
तिच्या या कमेंटनंतर मुंबई इंडियन्सनेही उत्तरात आपल्या चाहत्यांना विचारत लिहिले, ‘जेमिमाला खरेदी करण्याचा विचार करावा का?’
उजव्या हाताची फलंदाज असलेल्या जेमिमाने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले. सध्या ती भारतीय संघाची नियमित सदस्य आहे. तिने भारतीय संघासाठी आतापर्यंत 21 वनडे आणि 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे सामन्यांमध्ये, जेमिमाने सुमारे 20 च्या सरासरीने 394 धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच टी20 मध्ये 30 च्या सरासरीने 1273 धावा केल्या आहेत. तिने टी20 मध्ये आतापर्यंत सात अर्धशतके झळकावली आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला खेळल्या गेलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी जेमिमाला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. परंतु त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघात पुनरागमन केले. बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेमिमाची कामगिरी चांगली होती. तिने भारतीय संघासाठी पाच सामन्यात 146 धावा केल्या होत्या. यादरम्यान तिने बार्बाडोसविरुद्ध स्पर्धेतील एकमेव अर्धशतकही झळकावले. अंतिम फेरीतही तिने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूला नाबाद दिल्यामुळे भारतीय चाहत्यांनी घातला गोंधळ, पंचांशी रोहितची चर्चा व्यर्थ
रिषभ की कार्तिक? कोण आहे टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक? चाहते विचारतायेत प्रश्न
INDvsPAK | एकट्या अर्शदीपवर फुटलं पराभवाचं खापर, पण रोहितसह ‘हे’ चौघेही राहिलेत व्हिलन