भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या चौथ्या कसोटीला ४ मार्चपासून अहमदाबाद येथे सुरुवात होईल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा अखेरचा सामना आहे. या सामन्यापूर्वी, भारताचे सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत. भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल हा देखील जिममध्ये मेहनत घेताना दिसला. त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका छायाचित्रामुळे त्याला जिमी निशामने ट्रोल केले आहे.
मयंकने शेअर केले छायाचित्र
अहमदाबाद येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी आधी भारतीय संघ जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अगरवाल हा देखील जिममध्ये मेहनत घेताना दिसला. त्याने जिममधील एक छायाचित्र शेअर केले.या छायाचित्रामध्ये मयंकने अतिशय वेडेवाकडे हावभाव केले आहेत. या पोस्टखाली कॅप्शन देत त्याने लिहीले, ‘हे सर्व काही प्रयत्नांबाबत आहे. तुम्ही दररोज प्रयत्न करत राहिला तर एक दिवस नक्कीच परिवर्तन होते.’ त्याच्या या छायाचित्राला चाहत्यांची चांगलीच पसंती लाभत आहे.
निशामने केले ट्रोल
न्यूझीलंडचा अष्टपैलू व मागील वर्षी किंग्स इलेव्हन पंजाब संघामध्ये मयंकचा सहकारी असलेल्या जिमी निशामने मयंकने शेअर केलेल्या छायाचित्रावरून त्याला ट्रोल केले आहे. मयंकच्या पोस्ट खाली कमेंट करत निशामने म्हटले, ‘मुलगा की मुलगी?’ निशामचे हे उत्तर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
मागील वर्षी पंजाब संघाचा भाग होता निशाम
निशाम मागील वर्षी किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा भाग होता. त्यावेळी निशामला अपेक्षित कामगिरी करता न आल्याने पंजाब संघ व्यवस्थापनाने त्याला करारमुक्त केले होते. त्यानंतर, २०२१ आयपीएल लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. दुसरीकडे, मयंक अगरवाल मागील तीन हंगामापासून किंग्स इलेव्हन पंजाब (आताचे पंजाब किंग्स) संघाचा भाग आहे. मागील वर्षी त्याने ११ सामन्यात एका शतकासह ४२४ धावा फटकावल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
विकेट घेताच दिसले मोहम्मद आमिरचे रागीट रूप, पाहा आक्रमक सेलिब्रेशनचा व्हिडिओ
बार्सिलोना क्लबचे माजी अध्यक्ष बार्तोमेओ यांना अटक, बार्सागेट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
विराटने बाहेर केलेल्या खेळाडूने मिळवून दिला रोमहर्षक विजय, ९ चेंडूत पालटला सामन्याचा नूर