लाॅर्ड्स | शनिवारी भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा कर्णधार इयान माॅर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या इंग्लंड संघ ३२.२ षटकांत ३ बाद १९३ धावांवर खेळत आहे.
या ३ पैकी ३ विकेट कुलदीप यादवला मिळाल्या आहेत. त्याने या सामन्यात जेसन राॅय (४०), जाॅनी बेयरस्टो (३८) आणि इयान माॅर्गन (५३) या मोठ्या खेळाडूंना बाद केले.
७ षटकांत गोलंदाजी करताना केवळ ४० धावा देत त्याने ही कामगिरी केली आहे.
०३ जूलै रोजी भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु झाला. आज टी२० आणि वनडे पकडून भारताचा हा ५वा सामना आहे. त्यातील ४ सामन्यात कुलदीपला खेळायला मिळाले. त्यात त्याने १५० चेंडूत १२३ धावा देत चक्क १४ विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या टी२० सामन्यात ५ तर पहिल्या वनडेत ६ आणि आज ३ अशी त्याने कामगिरी केली आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात या खेळाडूला ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
२२ वनडे सामने खेळणाऱ्या कुलदीपने आज जर २ विकेट्स घेतल्या तर तो जगातील दुसरा जलद ५० विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.
महत्त्वाच्या बातम्या:
-म्हणुन धोनी आहेत जगातील सर्वात हुशार क्रिकेटर…
-असाही एक विक्रम जो भारत इंग्लंड दुसऱ्या वनडेत टाॅसवेळी झाला
-काय सांगता! दक्षिण आफ्रिका ७३ धावांवर आॅल आऊट!