भारतीय संघात सध्या अनेक युवा खेळाडू खेळत आहेत. त्यांचा फिटनेसही उत्तम आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या सर्वोत्तम क्षेत्रकक्षक असणाऱ्या संघांमध्ये गणला जात आहे. असे असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार मायकल क्लार्कने भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
क्लार्कने २८ मेला भारत विरुद्ध बांगलादेश संघात विश्वचषक २०१९ पूर्वी झालेल्या सराव सामन्यादरम्यान समालोचन करताना जडेजाच्या क्षेत्रकक्षणाचे कौतुक केले आहे.
२०१५ च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार क्लार्क म्हणाला, ‘मला वाटते जगात त्याच्यापेक्षा(जडेजा) सर्वोत्तम कोणी नाही. मग मैदानात धावा रोखणे असो किंवा कठिण झेल घेणे असो किंवा डायरेक्ट हीट (थेट चेंडू स्टंम्पवर फेकणे) करणे असो, तो शानदार आहे.’
जडेजा हा भारतीय संघातील एक चांगल्या क्षेत्ररक्षकांपैकी आहे. त्याच्या क्षेत्ररक्षणाचे याआधीही अनेकांनी कौतुक केले आहे.
याबरोबरच जडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने २०१९ विश्वचषकापूर्वी झालेल्या दोन्ही सराव सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताची वरची आणि मधली फळी लवकर बाद झाल्यानंतरही तळातल्या फलंदाजांच्या साथीने भारताचा डाव सांभाळत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
तसेच त्याने बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात अखेरच्या षटकात फलंदाजीला येत ४ चेंडूत ११ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याचबरोबर त्याने या दोन सामन्यात प्रत्येकी १ विकेटही घेतली आहे.
या दोन सराव सामन्यांपैकी भारताने न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्विकारला आहे तर बांगलादेश विरुद्ध विजय संपादन केला आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 जूनला साऊथँप्टनला होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–शोएब अख्तरला ते ट्विट पडले महागात, इंग्लंडच्या फलंदाजाने केले ट्रोल
–दक्षिण आफ्रिकेचा हा गोलंदाज म्हणतो विराट कोहली ‘अपरिपक्व’…
–विश्वचषक २०१९: टीम इंडियाला पहिल्याच सामन्याआधी बसला जोरदार धक्का