भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने कोलकातामध्ये स्वत: साठी अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, हसीननी सोमवारी कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्वत: च्या आणि मुलीच्या संरक्षणाची मागणी केली आहे.
या याचिकेत हसीनने आरोप केला आहे की, तिने ९ ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दिली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. ती म्हणाली की, राम मंदिराविषयी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आपल्याला धमक्या मिळत होत्या. ज्याची तक्रार तिने पोलिसांत केली होती. उच्च न्यायालयात पुढील आठवड्यात या खटल्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
खरं तर, हसीनने सोशल मीडियावर ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमीपूजनसाठी शुभेच्छाची पोस्ट केली होती, त्यानंतर तिला मारहाण आणि बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्या. यानंतर हसीननी ९ ऑगस्ट रोजी लालबाजार येथील कोलकाता पोलिस सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल केली होती.
हसीनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहिले होते की, “अयोध्यामधील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सर्व हिंदूंना शुभेच्छा.” बर्याच लोकांनी या पोस्टवर अश्लील प्रतिक्रिया दिल्या. यासह सोशल मीडियावर तिला बलात्कार आणि हत्येच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.
तिने आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, “हे फार दुर्दैवी आहे की ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्यानंतर मला काही मतलबी लोकांनी सतत त्रास दिला आहे. आणि मला शिवीगाळही केली गेली. काही लोकांनी मला जीवे मारण्याची व बलात्कार आणि विनयभंग करण्याचीही धमकी दिली आहे.
Cricketer Md Shami's estranged wife Hasin Jahan files plea before Calcutta HC, demanding security for herself & her daughter. Petition alleges police inaction on her 9 Aug complaint of receiving threats over a social media post on Ram Mandir. Matter likely to be heard next week.
— ANI (@ANI) September 14, 2020
तिने पुढे लिहिले की, “या प्रकारच्या परिस्थितीत मला असहाय्य वाटत आहे. त्याचबरोबर मी माझ्या मुलीच्या भविष्याबद्दलही काळजीत आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होणार्या सतत हल्ल्यांमुळे माझे लक्ष विचलित झाले आहे. कृपया मला मदत करा, कारण मला प्रत्येक क्षणी असुरक्षित वाटतंय. जर हे सर्व सुरूच राहिले तर मी मानसिकरीत्या खचून जाईल”.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी विरुद्ध न खेळणे दिलासा देणारी गोष्ट असेल; पहा कोण म्हणतंय
-माजी दिग्गज म्हणतो, आरसीबीने या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे, तरच….
-पीसीबीने शोएब अख्तरला दाखवला ठेंगा; ‘हा’ माजी खेळाडू राहणार पाकिस्तान संघाचा चीफ सिलेक्टर
ट्रेंडिंग लेख-
-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय
-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!
-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान