भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजय साजरा केला. सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला ६ गड्यांनी धूळ चारत भारताने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये टी२० मालिका विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर अनेक माजी क्रिकेटपटू व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. पाच वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सामनावीर ठरलेल्या हार्दिक पंड्या व विजयी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
भारताचा टी२० मालिकेत विजय
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीलाच तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर, कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव करत, टी२० मालिकेचा विजयी प्रारंभ केला. त्यानंतर, रविवारी (६ डिसेंबर) सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पछाडत ६ गडी राखून विजय आपल्या नावे केला. याचबरोबर, भारत तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशा आघाडीवर आला आहे.
या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४२ धावांचा तडाखा देत भारताला विजयी केले. पंड्याच्या या खेळीत ३ चौकार व २ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. पंड्याला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
मुंबई इंडियन्सने केले ट्वीट
हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर, पंड्या आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करत असलेल्या मुंबई इंडियन्सने ट्वीट करत लिहले, ‘बिस्ट इन ब्लू. बेस्ट इन ब्लू. २२ चेंडूतील ४२ धावांसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे.’
Beast in Blue. Best in Blue 💙
For his 🔥 42* (22), Hardik Pandya is the Player of the Match 🏆#OneFamily #MumbaiIndians #AUSvIND @hardikpandya7 pic.twitter.com/O2JaIE2Tl4
— Mumbai Indians (@mipaltan) December 6, 2020
हार्दिकने नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये मुंबईच्या अनेक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने अनेक धडाकेबाज खेळ्या केल्या होत्या. हार्दिक २०१५ पासून मुंबई संघाचा सदस्य आहे. हार्दिकने मुंबईसाठी खेळलेल्या ६ वर्षात चार विजेतेपदे मिळवली आहेत.
मुंबईने चालू सामन्यातदेखील केली होती काही ट्विट्स
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील या दुसऱ्या सामन्यानंतर मुंबईने आणखी काही ट्विट्स केली होती. भारताच्या डावातील अखेरच्या षटकात मुंबईने ट्विट केले होते, ‘शेवटच्या षटकात १४ धावांची गरज आहे. कुंग फू पंड्या भारताला अडचणीतून बाहेर काढणार.’
14 needed from six balls? Kung Fu Pandya to the rescue 🔥#OneFamily #MumbaiIndians #AUSvIND @hardikpandya7 @BCCI pic.twitter.com/xe5ks9Uj9k
— Mumbai Indians (@mipaltan) December 6, 2020
“Two good hits!” 😎 pic.twitter.com/caMZXmXLmT
— Mumbai Indians (@mipaltan) December 6, 2020
HARDIK PANDYA YOU BEAUTY!!!!!#OneFamily #MumbaiIndians #AUSvIND
— Mumbai Indians (@mipaltan) December 6, 2020
त्यानंतरही, हार्दिक पंड्याने सामन्यानंतरच्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांची काही ट्विट्स मुंबई इंडियन्सने केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
धवनने पाडला धावांचा पाऊस; अर्धशतक करत गंभीर, रैनालाही टाकले मागे
अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान
ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर