इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा प्रमुख फलंदाज नितीश राणा याने नुकताच एका गोष्टीचा खुलासा केला आहे. नितीश राणाने आयपीएलच्या कारकिर्दीची सुरुवात 2015 पासून केली. नितीश राणाने जेव्हा आयपीएल मध्ये पर्दापण केले तेव्हा त्याला अनेक शंका होत्या. त्याच शंकांचे निरसन करण्यास नितीश एकदा विराट कोहलीच्या घरी गेला होता. त्याच बरोबर नितीशने त्यावेळी विराटकडून फलंदाजीचे सल्ले देखील घेतले. त्याने नुकताच हा किस्सा उलगडला.
नितीश राणाला ज्या काही अडचणी होत्या त्या त्याने विराटच्या सल्ल्याने दूर केल्या, असा खुलासा यावेळी त्याने केला. यावेळी आपण विराटकडून फलंदाजीचे सल्लेही घेतले, असे यावेळी नितीश राणाने सांगितले.
इंडिया टीव्ही सोबत बोलताना नितीश राणाने सांगितले की, “मी विराट भैय्याला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो. मी त्यांच्यासोबत बसून त्याच्या घरी गप्पा मारल्या. तो माझा आयपीएलचा पहिला हंगाम होता. मी त्यांना मला असलेल्या सर्व शंका विचारण्यास सुरुवात केली. तर त्यांनी मला मध्येच थांबून म्हटले की, तू माझ्याविरुद्ध पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत होतास ना? मी विचार करू लागलो की, त्यांनी मला कसे काय ओळखले? म्हणजे मैदानावर खूप गोष्टी घडत होत्या. आणि तरीदेखील त्यांना माहिती होते की, मी पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत आहे. त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांच्याकडून अनेक सल्ले घेतले. आणि माझ्या मनात असलेल्या सर्व शंकांचे त्यांनी निरसन केले. त्यामुळे मला खूप मदत झाली.”
साल 2015 मध्ये नितीश राणा मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग होता. परंतु त्याला अंतिम अकराच्या संघात खेळायची संधी आयपीएल 2016च्या हंगामात मिळाली होती. आयपीएल 2018 मध्ये नितीश राणाला कोलकाता नाईट रायडर्स या संघाने विकत घेतले. त्या हंगामापासून तो केकेआरच्याच संघाचा भाग आहे.
महत्वाच्या बातम्या:
दुर्दैवी शेफाली! चार धावांनी हुकले पदार्पणातील शतक, पण नावे केले हे विक्रम
न्यूझीलंड संघाचे तीन हुकमी एक्के, ज्यांच्यापासून भारताला अंतिम सामन्यात राहावे लागणार सावध