इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या २० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रोमांचक सामना पहायला मिळाला होता. या सामन्यात दिल्ली संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. तसेच दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने तुफानी अर्धशतकी खेळी केली होते. या खेळीनंतर त्याच्या गर्लफ्रेंडने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली संघाकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांची जोडी मैदानात उतरली होती. शिखर धवनने २८ धावांची खेळी केली होती; तर पृथ्वी शॉने ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३९ चेंडूत ५३ धावांची खेळी केली होती.
या खेळीच्या जोरावर त्याची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली होती. या खेळीनंतर त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंगने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. तिने पृथ्वी शॉचे २ फोटोज् शेअर केले आहेत. एका फोटोत तो फलंदाजी करताना दिसून येत आहे. यावर तिने ‘अभिनंदन’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने त्याचा सामना संपल्यानंतर मुलाखत घेत असतानाचा फोटो शेअर केला होता. यावर तिने ‘येस बॉय’ असे लिहिले आहे.
पृथ्वी शॉने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत एकूण ४३ सामने खेळले आहेत. यात त्याने ९९२ धावा केल्या आहेत. यात त्याने ८ अर्धशतके झळकावली आहेत. यासोबतच त्याने ११९ चौकार आणि ३३ षटकार देखील लगावले आहेत. आज (२७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स संघाचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे.
कोण आहे प्राची सिंग?
गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ प्राची सिंगला डेट करत असल्याच्या बातम्यांना उधाण येत आहे. प्राची सिंग ही देखील अभिनय क्षेत्रात नवीनच आहे. तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात कलर्स टिव्ही शोमध्ये येणाऱ्या ‘उडान’ या मालिकेतून केली होती. तिने या मालिकेत वांशिका शर्माची भूमिका साकारली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना लसीकरणाबाबत बीसीसीआयची दुटप्पी भूमिका, भारतीयांना लस देणार तर परदेशी खेळाडू…
कोरोनामुळे आयपीएल फ्रँचयाझींचे ‘इतक्या’ कोटींचे नुकसान, प्रिती झिंटाच्या पंजाबला सर्वात मोठा फटका!