भारतीय संघ संध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील टी20 मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळवल्या गेल्या आहेत. एकदिवसीय मालिकेत मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेच्या आव्हानासाठी तयार आहे. बांगलादेश आणि भारत या संघामध्ये पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळवला जाईल. तसेच दुसरा सामना 22 डिसेंबरपासून ढाका येथे खेळवला जाईल. भारताच्या एकदिवसीय संघातील खेळाडू तिथेच उपस्थित आहेत तर कसोटी स्पेशलिस्ट खेळाडू देखील चट्टोग्राम येथे पोहचले आहेत. टी20 आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावणार आहे.
आर अश्विन (R. Ashwin), चेतेश्वर पुजारा आणि केएस भरत या खेंळाडूंना फक्त कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आले आहे. अश्विनने मालिकेची तयारी सुरु केली आहे, तर पुजारा आणि भरत रविवारी संघात सामील होतील. भारतीय संघाला ही कसोटी मालिका जिंकणे खूप महत्वाचे आहे, कारण विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंकतालिकेत भारत चांंगल्या स्थानावर नाहीये.
आर अश्विन याने एकट्याने सराव सुरु केला
आर अश्विन याने शनिवारी एकट्याने सराव सुरु केला. त्याने मागच्या 9 महिन्यांपासून एकही कसोटी सामना खेळला नाहीये. यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (KS Bharath) आणि दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) रविवारपासून सराव सुरु करतील. हे दोन्ही खेळाडू बांगलादेश अ संघाविरुद्ध सिलहट या ठिकाणी अनाधिकारीक कसोटी सामना खेळत होते. रविवारी भारतीय संघांचे पहिले सराव सत्र ठेवले होते. या सराव सत्रात कुलदीप यादव (Kuldeep Yadav), केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे खेळाडू सहभाग घेणार नाहीत. ह सर्व खेळाडू शनिवारी बांगलादेश विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळले होते.
शनिवारी (दि. 10 डिसेंबर) भारत आणि बांगलादेश या संघात खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या ईशान किशन (Ishan Kishan) याने द्विशतक तर विराट कोहली (Virat Kohli) याने झंझावती शतक झळकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिने 18, अध्यक्ष 4! ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नक्की काय सुरूये?
ऑस्ट्रेलियाने उडवली वेस्ट इंडिजची दाणादाण! 419 धावांनी मिळवला संस्मरणीय विजय