रायगड मराठा मार्वेल्स विरुद्ध पालघर काझीरंगा रहिनोस याच्यात आजचा तिसरा सामना झाला. दोन्ही संघांनी रेलीगेशन फेरीत पाहिले दोन्ही सामने जिंकले होते. रायगड संघाने आक्रमक सुरुवात केली. प्रशांत जाधवच्या चतुरस्त्र चढायानी रायगड संघाने पालघर संघावर लोन पाडला.
रायगड मराठा मार्वेल्स संघाने 18-11 अशी आघाडी मध्यंतराला मिळवली होती. रायगड कडून प्रशांत जाधव ने चढाईत उत्कृष्ट खेळ केला. तर अजय मोरे जबरदस्त पकडी केल्या. मात्र त्यानंतर पालघरच्या राहुल सवर व राज साळुंखे ने आक्रमक चढाया करत संघाची पिझाडी कमी केली. शेवटची पाच मिनिटं असताना रायगड कडे 27-25 अशी दोन गुणांची आघाडी होती.
अंत्यत चुरशीची झालेली लढत अखेरच्या मिनिटाला 32-32 असा सामना बरोबरीत सुटला. पालघर कडून राहुल सवर ने 14 गुण मिळवले तर रायगड कडून प्रशांत जाधव ने 11 गुण मिळवले. रायगड कडून पकडीत अजय मोरे 5 तर राज जंगम ने 4 पकडी केल्या. (Raigad Maratha Marvels vs Palghar Kaziranga Rhinos Match Draw)
बेस्ट रेडर- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
बेस्ट डिफेंडर्स- अजय मोरे, रायगड मराठा मार्वेल्स
कबड्डी का कमाल- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
परभणी पांचाला प्राईड संघाची धुळे चोला वीरांस वर मात
रेलीगेशन फेरीत नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाचा दुसरा विजय