मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान आयपीएल 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने विक्रमी 213 धावा अखेरच्या षटकात पार करत विजय संपादन केला. मुंबईच्या विजयानंतर आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत मोठा बदल झालेला दिसून आला. त्यामध्ये टॉप फोरमध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्या समोरील अडचणी आता वाढलेल्या दिसतात.
At the end of Match 4️⃣2️⃣ of #TATAIPL 2023, here’s how the Points Table stands! 🙌
Which position is your favourite team on currently? 🤔 pic.twitter.com/54u4I7lhrJ
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
रविवारी (30 एप्रिल) आयपीएलमध्ये दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला अखेरच्या चेंडूवर पंजाबने पराभूत केले. पंजाबने 201 धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थानला मात दिली. मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर 213 धावांचा पाठलाग करत स्पर्धेतील चौथा विजय संपादन केला. या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत बराच उलटफेर झालेला पाहायला मिळाला.
सध्या गतविजेता गुजरात टायटन्स 8 सामन्यात सहा विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लखनऊ सुपरजायंट्स संघाने आठ पैकी पाच सामने जिंकत दुसऱ्या स्थानी कब्जा केला आहे. रविवारी झालेल्या पराभवानंतरही राजस्थान व चेन्नई टॉप फोरमधील आपले स्थान राखून आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी नऊ सामने खेळले असून पाच विजय त्यांच्या नावे आहेत. पाचव्या क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्सने देखील 9 सामन्यात 5 विजय व 4 पराभव पत्करले असून, केवळ पण खराब नेट रनरेटमूळे ते पाचव्या क्रमांकावर उभे आहेत.
त्यानंतर आरसीबी, मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स हे संघ प्रत्येकी चार विजयासह सहाव्या, सातव्या व आठव्या स्थानी आहेत. तीन विजयांसह सनरायझर्स हैदराबाद नवव्या तर दोन विजयासह दिल्ली कॅपिटल्स अखेरच्या स्थानी आहे.
अशात प्ले ऑफचे तिकीट मिळवण्याची स्पर्धा आता चांगली रंगू शकते. अशात राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स ला विजय प्राप्त करत आपले सध्याचे स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
(Rajasthan Royals And Chennai Super Kings Play Offs Hopes Goes Down Mumbai Indians Going Up)