दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 च्या सुरुवातीला सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजला अफाट लोकप्रियता मिळाली होती. मात्र, जगावर अचानक कोरोनाचे संकट आल्याने ही लीग मागील वर्षी पूर्ण करण्यात आलेली. या लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद इंडिया लिजेंड्स संघाने मिळवले होते. आता या माजी खेळाडूंच्या लीगचा दुसरा हंगाम लवकरच सुरू होईल. याच स्पर्धेच्या संपूर्ण कार्यक्रमाची घोषणा झाली असून, सर्व संघ देखील जाहीर झाले आहेत.
या हंगामात एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. ज्यात इंडिया लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लिजेंड्स, वेस्ट इंडिज लिजेंड्स, ऑस्ट्रेलिया लिजेंड्स, श्रीलंका लिजेंड्स, बांगलादेश लिजेंड्स, इंग्लंड लिजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स यांचा समावेश आहे. न्यूझीलंड लिजेंड्स पहिल्या हंगामात सहभागी झाले नव्हते. यामुळे त्यांचा हा पदार्पणाचा हंगाम असेल.
The time is nearly here!
The Legendary Jung is back stronger than before! 8 teams, 4 cities, 23 matches!Catch all the live action on @Colors_Cineplex, Colors Cineplex Superhits, @Sports18 Khel, Jio and @justvoot. 📺
Tickets live on @bookmyshow 🎟️#RoadSafetyWorldSeries pic.twitter.com/Hu9ILeuyZu
— Road Safety World Series (@RSWorldSeries) September 5, 2022
यावर्षी स्पर्धेतील सात सामने कानपूरमध्ये होणार असून ते १० ते १५ सप्टेंबर दरम्यान खेळवले जातील. यानंतर 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान इंदूरमध्ये पाच सामने होतील. 20 सप्टेंबर रोजी एकही सामना होणार नाही. त्याच वेळी 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान डेहराडूनमध्ये सहा सामने होतील. अखेरीस 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान रायपूरमध्ये अंतिम आणि उपांत्य फेरीसह एकूण पाच सामने होणार आहेत. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या या लीगला सुरुवात झाली होती.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या (Road Safety World Series) मागील वर्षीच्या हंगामात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नेतृत्वातील इंडिया लिजेंड्स संघाने अंतिम सामन्यात श्रीलंका लिजेंड्स संघाला मात दिली होती. अंतिम सामना भारताने 14 धावांच्या अंतराने जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेहमी भारतीय संघावर निशाणा साधणारा पाकिस्तानी क्रिकेटर उतरला अर्शदीपच्या समर्थनार्थ, म्हणतोय..
‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!