भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात करत भारताने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये टी२० मालिका विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा नियमित उपकर्णधार असणाऱ्या रोहित शर्मानेही ट्वीट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित शर्माने केले भारतीय संघाचे अभिनंदन
भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर ट्विटरवरून अनेकांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बीसीसीआय सचिव जय शाह, भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना तसेच हरभजन सिंह यांनी ट्वीट करत भारतीय संघाचे व खेळाडूंची प्रशंसा केली. यांसोबतच, सध्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असलेला भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार रोहित शर्माने देखील आपल्या संघसहकाऱ्यांचे कौतुक केले.
रोहितने ट्वीट करताना लिहिले, ‘हा भारतीय संघासाठी अप्रतिम मालिका विजय आहे. भारतीय संघाने दाखवलेला हा छान आणि ठोस खेळ मला आवडला. संघातील सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा.’
What a series win for Team India. Loved the way they played nice and composed. Big 👍 to each one of them. @BCCI
— Rohit Sharma (@ImRo45) December 6, 2020
रोहितने या ट्विटमध्ये बीसीसीआयला देखील टॅग केले आहे.
भारतीय संघाने केला आव्हानाचा यशस्वी पाठलाग
दौऱ्याच्या सुरुवातीलाच तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव करत, टी२० मालिकेची विजयी सुरुवात केली होती. त्यानंतर, आज सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया पछाडत ६ गडी राखून विजय मिळवला. याचबरोबर, भारत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशा आघाडीवर आला आहे.
दुखापतीमुळे बाहेर आहे रोहित
रोहित सध्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. मागील महिन्यात संपलेल्या आयपीएलदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषित झालेल्या भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली नव्हती. मात्र, त्यावरून वाद झाल्याने त्याला कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले.
भारतीय संघाचे इतर खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर रोहित सध्या बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतोय. तो अजून ऑस्ट्रेलियाला गेला नसल्याने, त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धवनने पाडला धावांचा पाऊस; अर्धशतक करत गंभीर, रैनालाही टाकले मागे
अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान
ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर