मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान आयपीएल 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) सामना खेळला गेला. ऐतिहासिक ठरलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने विक्रमी 213 धावांचा यशस्वी पाठलाग केला. संघाच्या या विजयात आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडचे मोलाचे योगदान राहिले. त्याने आपल्या तुफानी फलंदाजीने सामना संपवला. त्यानंतर आता त्याची तुलना मुंबईचा माजी क्रिकेटपटू कायरन पोलार्ड याच्याशी होऊ लागली आहे. याबाबत विचारले असता मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने आपले मत व्यक्त केले.
आयपीएल इतिहासात मुंबईला वानखेडे स्टेडियमवर प्रथमच 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्याची संधी होती. सूर्यकुमार यादव याच्या शानदार फलंदाजीने हे आव्हान अवाक्यात आले होते. मात्र, सूर्यकुमार मोक्याचे क्षणी बाद झाल्याने टीम डेव्हिड याच्यावर सामना संपवण्याची जबाबदारी आली होती. त्याने ही जबाबदारी चोख पार पाडली. केवळ 14 चेंडूवर 5 उत्तुंग षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद 45 धावा केल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना त्याने जेसन होल्डरच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकत सामना संपवला.
त्याच्या या खेळीनंतर त्याची तुलना मुंबई इंडियन्सचा माजी फिनिशर व सध्या फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या कायरन पोलार्डशी होतेय. सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना हर्षा भोगले यांनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला याबाबत विचारले. त्यावर तो म्हणाला,
“पोलार्डची जागा भरून काढणे अवघड आहे. त्याने अनेक वर्ष संघाला असे अनेक सामने जिंकून दिले आहेत. तशीच क्षमता डेव्हिडकडे देखील आहे. तो असा खेळत असताना गोलंदाजाला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना दडपण येते.”
डेव्हिड हा केवळ दुसऱ्याच वर्षी मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना दिसतोय. पोलार्ड याने 2010 ते 2022 असे 13 वर्ष मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. मुंबईने जिंकलेल्या पाचही विजेतेपदात त्याचा सिंहाचा वाटा होता.
(Rohit Sharma Talk About Kieron Pollard And Tim David Comparison As Finisher For Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेवर डेव्हिडचीच दहशत! आजवर 98 चेंडू खेळत ठोकलेत इतके षटकार, स्ट्राइक रेट तर बापच
रोहितला बाद देण्याचा निर्णय वादात! पंचांनी केले दुर्लक्ष? सोशल मीडियावर रंगली चर्चा