मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या युएईमध्ये आहे आणि तो मुंबई इंडियन्स संघात नेट गोलंदाज म्हणून सहभागी झाला आहे. नुकताच अर्जुन त्याच्या एका फोटोसह सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला होता. या फोटोत अर्जुन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसला होता, यावर लोकांनी त्याला लक्ष्य केले होते.
आता अर्जुनने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपली फिट बॉडी दाखवताना दिसत आहे.
अर्जुन तेंडुलकरने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यात अर्जुन खूप फिट दिसत आहे तसेच त्याचे सिक्स पॅकही जबरदस्त दिसत आहेत.
अर्जुन मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसाठी नेटवर गोलंदाजी करत आहे. मात्र, अर्जुन अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करू शकलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२० साठी सर्व फ्रँचायझी संघांना एसओपी नियुक्त केले असून त्यानुसार संघाला एखाद्या खेळाडू बदलण्याची गरज भासल्यास ते त्याऐवजी युएईमध्ये उपस्थित असलेल्या खेळाडूला त्याच्या जागी घेतील.
अशा परिस्थितीत जर मुंबई इंडियन्स संघाला त्याची गरज भासली. तर ते या मोसमात अर्जुन तेंडुलकरला मैदानात उतरवू शकतात.
मास्टर ब्लास्टर सचिनचा मुलगा अर्जुन राष्ट्रीय संघात पदार्पण करण्यापूर्वी बर्याच वेळा चर्चेत आला आहे. कूच बिहार ट्रॉफी, मुंबई टी२० लीग अशा अनेक स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. अर्जुन राष्ट्रीय संघात येण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन स्वत: ची तयारी करत आहे.