आयपीएल २०२२नंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाबाबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
कार्तिकचे (Dinesh Karthik ) कौतुक करताना आयपीएलमधील चांगल्या प्रदर्शनाचे फळ कार्तिकला मिळाले (Dinesh Karthik Comeback In Team India) असल्याचे अख्तरने (Shoaib Akhtar) सांगितले आहे. कार्तिकने त्याच्या वैयक्तिक आयुष्याला क्रिकेट कारकिर्दीच्या आड येऊ दिले नाही. वैयक्तिक आयुष्यातील संकटांचा सामना करत त्याने भारतीय संघात पुनरागमन केले असल्याने त्याचे कौतुक करावे तितके कमीच, अशी प्रतिक्रिया अख्तरने (Shoaib Akhtar On Dinesh Karthik) दिली आहे.
शोएब अख्तरची पूर्ण प्रतिक्रिया
“मी कार्तिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ऐकले आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्य सोपे राहिलेले नाही. मात्र त्याने त्याच्या वैयक्तिक गोष्टींना त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या आड येऊ दिले नाही. त्याने ज्याप्रकारे पुनरागमन केले आहे, ते शानदार आहे. यावरून त्याच्यात किती उत्साह भरलेला आहे, हे दिसून येते. क्रिकेटमध्ये असाच जोश असावा लागतो. कार्तिक माझ्या युगातील खेळाडू आहे. त्याने ज्याप्रकारे भारतीय संघात पुनरागमन केले आहे, ते प्रशंसनीय आहे. तो शारिरीक आणि मानसिकरित्या पूर्णपणे फिट आहे. याचमुळे तो चांगले प्रदर्शन करत आहे,” असे अख्तरने म्हटले आहे.
तसेच अख्तरने कार्तिकला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुढे बोलताना अख्तर म्हणाला की, “मी कार्तिकच्या क्रिकेट कारकिर्दीला जवळून फॉलो केले आहे. त्याने ज्याप्रकारे वयाच्या ३६ व्या भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.”
दिनेश कार्तिकचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
कार्तिक आयपीएल २०२२च्या हंगामात नव्या रूपात दिसला आहे. त्याने बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्त्व करताना फिनिशरची भूमिका निभावली आहे. कार्तिकने आयपीएलच्या चालू हंगामात १५ सामने खेळताना ६४.८० च्या सरासरीने ३२४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघाले आहे. त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद ६६ धावा इतकी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: फक्त एक स्टंप दिसत असतानाही गोलंदाजाने उडवल्या बेल्स; थ्रो पाहून सर्वजण हैराण
राजस्थानला धूळ चारत प्लेऑफच्या बड्या विक्रमात बेंगलोर चेन्नईची करणार का बरोबरी? पाहा काय आहे रेकॉर्ड
शतकी खेळीआधी रजत पाटीदारला संघात नव्हते जास्त महत्त्व? आरसीबीचा तो Video व्हायरल