भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्थान मिळालेले नाही. शमीला वनडे विश्वचषक 2023 मध्ये दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. शमी सध्या एनसीएमध्ये त्याच्या दुखापतीवर काम करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शमी संघासाठी खूप उपयुक्त ठरेल, असे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे.
भारताला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेनंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने सलग दोन मालिका जिंकल्या आहेत. यावेळी संघ मालिका विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करेल.
घोट्याच्या ऑपरेशनमुळे मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यापूर्वी हा वेगवान गोलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास गांगुली यांना आहे. ते म्हणाले, “मला माहित आहे की, मोहम्मद शमीचा दुखापतीमुळे संघात समावेश नाही. मात्र, तो लवकरच परतणार आहे. कारण, भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. भारताचे आक्रमण सध्या चांगले आहे.
गांगुली पुढे म्हणाले, “मी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची वाट पाहत आहे. संघाची खरी कसोटी तिथेच असेल. यानंतर संघाला जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे असून, हे दोन्ही दौरे अत्यंत महत्त्वाचे असतील. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपस्थिती आणि शमीचे पुनरागमन यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजी मजबूत होईल.” शमी याने वनडे विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक बळी मिळवले होते. मात्र, त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही.
शमी अनुपस्थित असल्याने आता भारतीय संघात युवा वेगवान गोलंदाजांना संधी मिळतेय. कसोटी संघात आकाश दीप व डावखुरा यश दयाल यांना बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटीत स्थान मिळाले आहे. याशिवाय अनेक युवा वेगवान गोलंदाज भारतीय संघाचा दरवाजा खोटा होताना दिसतात.
हेही वाचा-
सुरक्षा घेरा तोडून आझमला भेटायला पोहोचला चाहता, त्यानंतर रौफने असे काही करत जिंकली मनं
कोहली किंवा जो रूट नाही तर ‘हा’ बनेल कसोटीतील सर्वकालीन महान खेळाडू, गांगुलीची भविष्यवाणी
उपकर्णधारापासून ‘द वॉल’पर्यंत, या दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद!