भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्यावर सध्या भरपूर टीका होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषक 2022 मधील सुपर-2 सामन्यात अर्शदीपच्या हातून एक सोपा झेल सुटला, जो भारताला खूप महागात पडला. याचमुळे क्रिकेटचाहते अर्शदीपवर निशाणा साधत आहेत. यादरम्यान काही क्रिकेटपटू मात्र पुढाकार घेत अर्शदीपच्या पाठीशी उभे ठाकत आहेत. यातच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज यानेही अर्शदीपची पाठराखण केली आहे.
हाफिज अर्शदीपच्या (Arshdeep Singh) बाजूने बोलला आहे. त्याने भारतीय चाहत्यांना अर्शदीपवर निशाणा न साधण्याची विनवणी केली आहे. त्याने (Mohammad Hafeez) ट्वीट करत लिहिले आहे की, “समस्त भारतीय चाहत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही माणसे आहोत आणि माणसांकडूनच चुका होतात. खेळात अशा चुका होत असतात. अशा चुकांवरून कृपया कोणाचाही अपमान करू नका.” असे लिहित हाफिजने अर्शदीपला टॅग केले आहे.
My request to all Indian team fans. In sports we make mistakes as we r human. Please don’t humiliate anyone on these mistakes. @arshdeepsinghh
— Mohammad Hafeez (@MHafeez22) September 4, 2022
का अर्शदीप ठरलाय खलनायक?
दरम्यान अर्शदीपने (Arshdeep Singh) पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली (Asif Ali Catch) याचा सोपा आणि महत्त्वपूर्ण झेल सोडला आहे आणि याचमुळे त्याला भारताच्या पराभवाचे खलनायक ठरवले जात आहे. पाकिस्तानच्या डावातील अठराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आसिफने साधारण फटका मारला होता. यावेळी क्षेत्ररक्षक अर्शदीपकडे तो झेल टिपत आसिफला शून्य धावेवर परत पाठवण्याची संधी होती. परंतु अर्शदीपच्या (Arshdeep Singh) हातून तो सोपा झेल सुटला. त्यानंतर आसिफने 8 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या, ज्या पाकिस्तानच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. याच कारणामुळे अर्शदीपवर टीका होत आहे.
असे असले तरीही, अर्शदीपने या सामन्यात किफायतशीर गोलंदाजी केली होती. त्याने 3.5 षटके फेकताना 27 धावा देत एक विकेट घेतली होती. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 7 होता. मात्र इतर भारतीय गोलंदाज महागडे ठरले. भुवनेश्वर कुमारने 40 धावा खर्च केल्या. हार्दिक पंड्यानेही 44 व युझवेंद्र चहलने 43 धावा दिल्या. त्यांना फक्त एकच विकेट घेता आली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’
एक झेल काय सुटला, पाकिस्तानी चाहत्यांची अर्शदीपवर पातळी सोडून टिका! म्हणतायेतं ‘खलिस्तानी’
एका कॅचमुळे खलनायक ठरलेल्या अर्शदीपची विराटकडून पाठराखण; म्हणाला, ‘दबावात कोणा…’