मुंबई । इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात ब्रॉडने आपल्या कारकिर्दीत 500 कसोटी विकेट घेण्याचा कारनामा केला. त्याच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने वेस्ट इंडिजवर 2-1 अशी मालिका विजय मिळवला. ब्रॉडने आतापर्यंत इंग्लंडकडून चमकदार कामगिरी केली आहे.
स्टुअर्ट ब्रॉडच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 500 विकेट घेतल्यानंतरही तो घराच्या मैदानावर दादा असल्याचे दिसून येते. त्याने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 501 बळी घेतले आहेत, त्यापैकी परदेशात त्याने केवळ 180 विकेट घेतल्या आहेत. तर ब्रॉडने घरच्या मैदानावर 321 बळी घेतले आहेत. याचाच अर्थ घराबाहेर या खेळाडूने फक्त 35.92 टक्के विकेट घेतल्या आहेत.
याखेरीज घरच्या मैदानावर या खेळाडूच्या गोलंदाजीची सरासरी 25.91 आहे, तर घराबाहेर मैदानावर 31.58 पर्यंत वाढते. यावरून हा खेळाडू घरच्या मैदानावर दादा असल्याचे दिसून येते.
जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळतो तेव्हा ब्रॉडची गोलंदाजीची सरासरी 20.97 असते. जेव्हा इंग्लंडचा संघ भारतात येतो तेव्हा या खेळाडूची गोलंदाजीची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.
स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडमध्ये 3 वेळा 10 बळी घेतले आहेत, तर परदेश दौर्यामध्ये या खेळाडूने एकाही सामन्यात 10 बळी घेतले नाहीत. त्याच वेळी, ब्रॉडला विदेशात फक्त 5 वेळा एका डावात 5 विकेट्स मिळविण्यात यश आले आहे, तर घरच्या मैदानांवर 13 वेळा त्याने एका डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली.
कसोटी कारकीर्दीत या खेळाडूने आतापर्यंत 4740 षटके फेकली असून त्यात ब्रॉडने 1113 षटके निर्धाव टाकली. फलंदाजांनी त्यांच्या चेंडूवर 14002 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ब्रॉडने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 501 फलंदाजांना ड्रेसिंगरुमचा रस्ता दाखविला.
कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा ब्रॉड चौथा वेगवान गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियन महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा, वेस्ट इंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू कर्टनी वॉल्श आणि इंग्लंडचा त्याचा साथीदार जेम्स अँडरसन यांनी आतापर्यंत हे यश संपादन केले आहे.
सर्वाधिक कसोटी विकेट्स श्रीलंकेचे माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरन (800) च्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (708) दुसर्या क्रमांकावर असून भारतीय अनुभवी अनिल कुंबळे (619) तिसर्या क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम
कर्टिस कॅम्फर – आयर्लंड क्रिकेटचा भविष्यातील सितारा
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान
विमानतळावर लाऊंजच्या एका कोपऱ्यात बसून राहिला ‘हा’ खेळाडू, जाणून घ्या कारण..